नंदुरबार जिल्ह्यात पावसाची सरासरी 30 टक्के तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:50 PM2018-07-20T12:50:16+5:302018-07-20T12:50:35+5:30

Average rainfall of 30% in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात पावसाची सरासरी 30 टक्के तूट

नंदुरबार जिल्ह्यात पावसाची सरासरी 30 टक्के तूट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात केवळ नंदुरबार जिल्ह्यातच पावसाने सरासरी गाठली नसल्याची स्थिती आहे. सरासरीच्या तुलनेत 30 टक्के कमी पाऊस झाला असून पिकांची स्थिती नाजूक आहे. येत्या काळात पाऊस झाला नाही तर मोठी समस्या निर्माण होणार असून त्यादृष्टीने प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्येही अवघा 20 टक्के पाणीसाठा आहे. 
भारतीय हवामान खात्याने राज्यातील जिल्हानिहाय पावसाची सरासरी टक्केवारी जाहीर केली आहे. त्यात केवळ नंदुरबार जिल्हाच डेंजरझोनमध्ये दाखविण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतार्पयत सरासरीचा केवळ 26 टक्के पजर्न्यमान    झाले आहे. जे एकूण पावसाच्या तुलनेत   उणे 29 इतके आहे. यामुळे वातावरणाची आणि पावसाची अशीच स्थिती राहिल्यास येत्या काळात जिल्ह्यात पाण्याची स्थिती गंभीर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्ह्याची एकूण पावसाची सरासरी 835.83 मि.मी.आहे. गेल्या चार वर्षाचा विचार करता केवळ गेल्यावर्षीच पावसाने सरासरीची नव्वदी गाठली होती. यंदा राज्यभरात सर्वत्र पावसाचे प्रमाण समाधानकारक आणि सरासरीच्या तुलनेत राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु नंदुरबारवर मेघराजाने पाठ फिरविल्याने जून व जुलै महिन्याची सरासरीदेखील गाठता आली नसल्याचे चित्र आहे.
2015 मध्ये जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ 15 टक्के पाऊस झाला होता. पावसाचे दिवस अवघे दोन होते.  त्यात नंदुरबार तालुक्यात 24.70 टक्के, नवापूर 1.95, शहादा 18.37, तळोदा 9.89, अक्कलकुवा 3.12 तर धडगाव 29.14 टक्के पाऊस झाला होता.
2016 मध्ये जून महिन्यात 41.68 टक्के पाऊस झाला होता. पावसाचे दिवस सरासरी पाच होते. नंदुरबार तालुक्यात 39.89 टक्के, नवापूर 31.73, शहादा 38.84, तळोदा 44.73, अक्कलकुवा 40.29 तर धडगाव 56.95 टक्के पाऊस झाला होता.
2017 मध्ये जून महिन्यात 102 टक्के पाऊस झाला होता. त्यात पावसाचे दिवस सरासरी दहा होते. नंदुरबार तालुक्यात 107.47 टक्के, नवापूर 93.25, शहादा 71.00, तळोदा 144.44, अक्कलकुवा 137.22 तर धडगाव 64.53 टक्के पाऊस झाला होता.
यंदा अर्थात 2018 मध्ये जून महिन्यात सरासरीचा केवळ 13.82 टक्के पाऊस झाला. पावसाचे दिवस केवळ आठ राहिले. नंदुरबार तालुक्यात 13.95 टक्के, नवापूर 5.52, शहादा 19.67, तळोदा 18.37, अक्कलकुवा 13.63 तर धडगाव 16.28 टक्के पाऊस झाला होता. जुलै महिन्यातील 20 दिवसांची स्थिती पहाता जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पुन्हा तेवढाच अर्थात 13 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतार्पयत सरासरीचा केवळ 26 टक्के पाऊस झाला आहे. त्यातही नंदुरबार तालुक्यात सर्वात कमी 17 टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वात जास्त पाऊस धडगाव तालुक्यात 38 टक्के पाऊस झाला आहे. पावसाच्या सरासरीच्या तुलनेत अद्यापही 30 टक्क्यांची तूट कायम आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ही तूट भरून निघते किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे. पाणी टंचाई कायम
जिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती कायम आहे. उन्हाळ्यात यंदा 76 गावांना पाणी टंचाईची स्थिती होती. त्यातील 45 गावे एकटय़ा नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील होते. या गावांमध्ये अद्यापही टंचाईची तीव्रता कायम आहे. प्रशासनाने टंचाई उपाययोजनेची कामे जून महिन्यातच बंद केली आहेत. त्यामुळे अशा गावांना पाण्यासाठी पावसाळ्यात वणवण करावे लागत असल्याची स्थिती आहे. प्रकल्पासह नदी, नाले कोरडे जिल्ह्यातील नदी, नाले कोरडे आहेत. यंदाच्या पावसाळ्यात कुठलीही नदी किंवा नाला दुथडी भरून वाहू शकला नसल्याचे चित्र आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे गोमाई नदीला पूर आला होता, परंतु ते पाणी वाहून गेले. जून व जुलै महिन्यात एकदाही दमदार पाऊस झाला नसल्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापही ठणठणाट आहे. गेल्यावर्षी जुलैर्पयत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सरासरीचा 35 ते 40 टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा आहे तो पाणीसाठादेखील घटण्याच्या मार्गावर   आहे.
प्रशासनाने सतर्क राहावे
जुलै महिना संपण्यात आला तरी पावसाची अपेक्षित हजेरी लागली नाही. सरासरीचा केवळ 65 ते 68 टक्के पाऊस झाला आहे. त्यातही नंदुरबार तालुक्यात स्थिती विदारक आहे. त्यामुळे आगामी   पाणी टंचाई आणि पीक नुकसानीची स्थिती पहाता प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे. 
आधीच उशिराने पावसाचे आगमन झाल्यामुळे अनेक भागातील पेरणी वाया गेली होती. आता जेमतेम पेरण्या झालेल्या असतांना पावसाने दडी मारलेली असल्यामुळे पुन्हा पेरणी व पीक वाया जाण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर उपाययोजनांसाठी प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे.

Web Title: Average rainfall of 30% in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.