बंधारा येथे कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:26 PM2017-10-15T12:26:06+5:302017-10-15T12:26:06+5:30

लक्ष देण्याची गरज : गेल्या एक वर्षापासून ट्रान्सफार्मर नादुरुस्तच

Artificial water shortage at Bandra | बंधारा येथे कृत्रिम पाणीटंचाई

बंधारा येथे कृत्रिम पाणीटंचाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील बंधारा या आदिवासी गावातील विजेच्या ट्रान्सफार्मर गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त असल्याने या गावाच्या पाणीपुरवठादेखील विस्कळीत झाला आह़े परिणामी रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची व्यथा आह़े प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन तातडीने नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याची ताकीद संबंधितांना द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आह़े 
तालुक्यातील बंधारा हे गाव सातपुडय़ातील बंधारा हे गाव सातपुडय़ाच्या पायथ्याशी वसले आह़े या गावाची लोकसंख्या साधारण दीड ते दान हजार आह़े संपूर्ण आदिवासी गाव आह़े परंतु या गावातील विजवितरण कंपनीचा ट्रान्सफार्मर गेल्या वर्षापासून नादुरुस्त आह़े अजूनही नवीन ट्रान्सफार्मर ग्रामस्थांना बसवून देण्यात आलेला नाही़ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा या ट्रान्सफार्मरवरच जोडला असल्याने पाणीपुरवठासुध्दा यामुळे प्रभावीत झाला आह़े परिणामी ग्रामस्था कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आह़े पाण्यासाठी ग्रामस्थांना जवळच्या धरणाचा आसरा घ्यावा लागत आह़े गावात दोन हातपंप असले तरी त्यातील एक हातपंप अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आह़े जो सुरु आहे त्यातूनही पुरेसे पाणी निघत नसल्याने रहिवाशांना पिण्याचा पाण्याचा समस्येस तोंड द्यावे लागत आह़े या शिवाय पाण्याअभावी तेथील घरकुले आणि शौचालयांचे बांधकामेदेखील रखडली आहेत़ वास्तविक गेल्या वर्षभरापासून तेथील ट्रान्सफार्मर नादुरुस्त आह़े नवीन डी़पी़ साठी ग्रामपंचायतीच्या पदाधिका:यांमार्फत संबंधित विजवितरण कंपनीच्या कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आह़े मात्र केवळ बिलाची थकबाकी आणि जोडण्यांअभावी यंत्रणा नवीन ट्रान्सफार्मर देत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आह़े विजवितरण कंपनीत काही ग्राहकांच्या विजजोडण्या खंडीत केल्यानंतर त्यांनी न्यायालयामार्फत वीज बिले भरली आह़े तसेच ग्रामस्थांनी नवीन जोडण्यांचीही मागणी केली आह़े या उपरांतही नवीन डी़पी़साठी संबंधित अधिका:यांनी सकारात्मकता दाखवली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आह़े इकडे पाण्यासाठी रहिवाशांना वणवण करावी लागत आह़े यासाठी मजुरांना रोजंदारीदेखील बुडवावी लागत आह़े अशी वस्तूस्थिती असताना वरिष्ठ लोकप्रतिनिधीही याकडे साफ दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े निदान जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन कृत्रिम पाणी टंचाईला उदभवलेला प्रश्न मिटवावा अशी मागणी आह़े गेल्या मे महिन्यात आमदार उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या तालुक्याच्या आमसभेतदेखील बंधारा येथील जळीत ट्रान्सफार्मरचा प्रश्न ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी उपस्थित केला होता़ वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांनी चौकशी करुन तातडीने ट्रान्सफार्मर जोडण्याचे आश्वासन देण्यात आले होत़े त्यानंतर संबंधितांनी डी़पी़ बसविली नाहीच मात्र पाठपुरावा करुनही अजूनर्पयत कार्यवाही करण्यात आलेली नाही़ वास्तविक आमसभेत दाखल  झालेली तक्रारीची लगेच दखील घेण्याचा दंडक आह़े पंरतु संबंधित यंत्रणेने तोही धाब्यावर बसविल्याचा ग्रामस्थांचा आरोप आह़े 
 

Web Title: Artificial water shortage at Bandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.