बंधारफळी येथे गॅस कनेक्शनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:47 PM2018-02-21T12:47:53+5:302018-02-21T12:47:58+5:30

Allotment of gas connections at Bandarfali | बंधारफळी येथे गॅस कनेक्शनचे वाटप

बंधारफळी येथे गॅस कनेक्शनचे वाटप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : सामान्य कुटुंबातील स्त्रीयांना स्वयंपाक करताना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री ह्यउज्‍जवलाह्ण गॅस योजनेचा जिल्ह्यातील हजारो कुटुंब लाभ घेत आह़े उर्वरित प्रत्येक पात्र लाभाथ्र्यानाही लवकरच गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ़ हीना गावित यांनी दिली.
नवापूर तालुक्यातील बंधारफळी येथे पंतप्रधान ह्यउज्‍जवलाह्ण गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण खासदार डॉ़ हीना गावीत व आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांच्या हस्ते झाले.
या वेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस एजाज शेख, कुश गावीत, ज्योती जयस्वाल, जयंती अग्रवाल, सविता जयस्वाल, बंधारफळी गावाचे सरपंच रामु गावीत, प्रदीप वळवी, घनश्याम परमार, जाकिर पठाण, समीर दलाल आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील झाडांची कत्तल थांबावी, हवेतील प्रदूषण कमी व्हावे व महिलांचे आरोग्य उत्तम रहावे या मुख्य उद्देशाने प्रधानमंत्री ह्यउज्‍जवलाह्ण योजना सुरू करण्यात आली आह़े
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्रय रेषेखालील यादीत नाव असणे, रेशनकार्ड, आधारकार्ड, गाव नमुना आठ ह्यअह्ण व विद्युत बिल इत्यादी कागदपत्रे आवश्यक असल्याचेही या वेळी सांगण्यात आल़े दरम्यान, बाकी असलेल्या गॅस जोडण्या एजंसीमार्फत तात्काळ शंभर टक्के लोन सुविधेसह वाटप करण्यात येणार आहे. या योजनेत लाभाथ्र्याकडून कुठलेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, अशा सूचना गॅस एजंसीला देण्यात आल्या असल्याचेही खासदार डॉ़ गावीत यांनी सांगितल़े

Web Title: Allotment of gas connections at Bandarfali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.