लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील आडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधांमुळे रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्रीच्यावेळी उपचारासाठी येणा:या रुग्णांचे हाल होतात. या आरोग्य केंद्रांतर्गत येणा:या उपकेंद्रांची स्थितीही बिकट असून मुलभूत सुविधांअभावी हे आरोग्य केंद्रच ‘सलाईन’वर असल्यासारखी स्थिती आहे.आडगाव या 100 टक्के आदिवासी वस्ती असलेल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्राला आजूबाजूची गावे जोडलेली असून तेथील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र या आरोग्य केंद्रात मुलभूत सोयी-सुविधा नसल्याने उपचारासाठी येणा:या रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. रात्री-अपरात्री गरोदर महिलांना प्रसूतीसाठी व इतर गंभीर रुग्णांना येथे उपचारासाठी आणले जाते. त्यामुळे कर्मचा:यांना नेहमी सतर्क रहावे लागते. मात्र वैद्यकीय अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने रात्रीच्यावेळ उपचारासाठी येणा:या रुग्णांचे हाल होतात. या केंद्रात उपचार न मिळाल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावे लागतात. त्यामुळे आर्थिक भरुदडही गरीब व गरजू रुग्णांना सहन करावा लागतो.या प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर ऊर्जा पॅनलही बंद अवस्थेत आहे. परिणामी प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या नातेवाईकांना गरम पाण्याची स्वत:च व्यवस्था करावी लागते. शुद्ध व थंड पाण्याचे फिल्टरही बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना घरुन पाणी आणावे लागते.आरोग्य केंद्रात वापरल्या जाणा:या सलाईनच्या रिकाम्या बाटल्या, वापरलेले इंजेक्शन, हॅण्डग्लोज, प्रसूतीदरम्यान वापरात येणारे निकामी साहित्य व प्लॅस्टीकचे इतर साहित्य आरोग्य केंद्राच्या आवारातच टाकण्यात येते. हे निकामी साहित्य उघडय़ावरच टाकण्यात येत असल्याने कधी कधी दरुगधीही पसरते.आरोग्य केंद्रातील कर्मचा:यांसाठी असलेली निवासस्थाने वापराविना धूळखात पडून आहेत. या केंद्रात मुलभूत सोयी-सुविधाच नसल्याने ते ‘सलाईन’वर असल्यासारखी स्थिती झाली आहे. त्याचा त्रास मात्र येथे उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातवाईकांना सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी दखल घेऊन या आरोग्य केंद्रात सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊन रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी होत आहे.