धडगावात अतिक्रमण निर्मुलन मोहिमेंतर्गत दुकानांंवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 08:25 PM2019-05-20T20:25:59+5:302019-05-20T20:26:15+5:30

धडगाव : शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा ठेवलेल्या टपऱ्या तसेच किरकोळ व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली़ शनिवारी झालेल्या या ...

Action on shops under encroachment prevention campaign in Dhadgaon | धडगावात अतिक्रमण निर्मुलन मोहिमेंतर्गत दुकानांंवर कारवाई

धडगावात अतिक्रमण निर्मुलन मोहिमेंतर्गत दुकानांंवर कारवाई

Next

धडगाव : शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा ठेवलेल्या टपऱ्या तसेच किरकोळ व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली़ शनिवारी झालेल्या या कारवाईवेळी किरकोळ विक्रेत्यांनी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना विरोध करत जाब विचारला होता़
जुने तहसील ते होळी चौक या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ विक्रेत्यांची दुकाने आहेत़ खाद्यपदार्थ, मिरची, मसाले, भाजीपाला यांच्यासह विविध प्रकारच्या टपºया या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत़ वर्दळीचा रस्ता असल्याने पालिकेने येथील ५० व्यावसायिकांना नोटीसा दिल्या होत्या़ नोटीसांनुसार विहित मुदतीत अतिक्रमण काढून घेण्याचे सूचित करण्यात आले होते़ या नोटीसा किती लोकांना प्राप्त झाल्या याची खात्री न करताच शनिवारी अतिक्रम काढण्यास सुरुवात करण्यात आली़ दिवसभर व्यवसायाच्या तयारीने आलेल्या व्यावसायिकांना नगरपंचायतीच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही गटांमध्ये बराच वेळ वादही झाला़ याठिकाणी वर्षानुवर्षे व्यवसाय करत असल्याचा दावा यावेळी व्यावसायिकांकडून करण्यात आला़ यामुळे नगरपंचायतीने म्हणणे ऐकून घेण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती़ धडगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील ही अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली होती़ येथील दुकानांवर दैैनंदिन गरजेच्या वस्तू तातडीने मिळत असल्याने त्यांना सोयीचे होत होते़ शनिवारी दुपारी झालेल्या कारवाईदरम्यान रस्त्यावर बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांनाही उठवण्यात आल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त केली होती़ नगरपंचायतीने विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेत पुढील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे़ परंतू नगरपंचायत प्रशासन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे़ दोन दिवसांपासून व्यवसाय बंद असल्याने त्यांचे नुकसान झाले आहे़

Web Title: Action on shops under encroachment prevention campaign in Dhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.