5 lakh children health campaign in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात पाच लाख बालकांसाठी आरोग्य मोहिम
नंदुरबार जिल्ह्यात पाच लाख बालकांसाठी आरोग्य मोहिम

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद आरोग्य विभागांकडून 10 फेब्रुवारी रोजी जंतनाशक दिन साजरा होणार आह़े यावेळी सुरूवात करण्यात येणा:या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील एक ते सहा आणि अंगणवाडी ते 12 च्यावर्गातील पाच लाख बालकांना रोगमुक्त करण्याचे उद्दीष्टय़ ठेवण्यात आले आह़े यानुसार शाळा व अंगणवाडीत जंतनाशक गोळ्यांचे वाटप होणार आह़े 
जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी यांच्या अध्यक्षस्थतेखाली अधिकारी व जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली़ यावेळी शनिवारी जिल्ह्यात राबवण्यात येणा:या जंतनाशक मोहिमेबाबत चर्चा करण्यात आली़ मोहिमेद्वारे जिल्हा परिषद, आश्रमशाळा, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळा आणि  अंगणवाडय़ा यातील विद्यार्थी आणि बालकांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्याचे नियोजन झाले आह़े  ऑॅगस्टर्पयत ही मोहिम चालेल़ जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी आयोजित करण्यात येणा:या या मोहिमेद्वारे गतवर्षी 84 टक्के बालकांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले होत़े फेब्रुवारी आणि ऑगस्ट या दोन टप्प्यात ही मोहिम झाली़ यात जिल्हास्तरावरील तीन लाख 34 हजार 365 पैकी दोन लाख 80 हजार बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले होत़े यातही सर्वाधिक 35 हजार 214 गोळ्या ह्या तळोदा तालुक्यात वाटप केल्या गेल्या होत्या़ 
सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यात गेल्यावर्षी 64 हजार बालकांपैकी 57 हजार तर अक्कलकुवा तालुक्यातील गाव-पाडय़ांवर 70 हजारपैकी एकूण 59 हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या होत्या़ 
यंदा जिल्हा आरोग्य विभागाने 100 टक्के गोळ्या वाटपाचे उद्दीष्टय़ ठेवले असल्याने स्थानिक स्तरावर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी या वाटपावर लक्ष ठेवून असणार आहेत़ शाळांमधील शिक्षकांकडून या गोळ्यांचे फायदे समजावून देण्यात येणार असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आह़े उपक्रमासाठी जोरदार तया:या सुरू आहेत़ आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणा:या या मोहिमेसाठी जिल्हा सामान्य रूग्णालय, दोन उपजिल्हा रूग्णाल, 12 ग्रामीण रूग्णालय आणि 58 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कर्मचा:यांसह, ग्रामीण भागातील 1847 व शहरी भागातील 16 आशा स्वयंसेविकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आह़े त्यांच्याकडून शाळांचे शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांना गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आह़े 
या मोहिमेत नंदुरबार तालुक्यातील 366 शाळांचे 88 हजार 191, नवापूर तालुक्यात 365 शाळांमधील 52 हजार 57, शहादा तालुक्याच्या 400 शाळांमधील 92 हजार 215, तळोदा तालुक्यात 192 शाळांमधील 33 हजार 773, अक्कलकुवा तालुक्यात 33 हजार 619 तर धडगाव तालुक्यातील 344 शाळांमधील 33 हजार 619 विद्यार्थी व विद्यार्थिनी या उपक्रमात समाविष्ट असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आह़े
मोहिम सर्वतोपरी यशस्वी करण्यासाठी 1 ते सहा वर्ष वयाचे विद्यार्थीही समाविष्ट आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या 402, नवापूर-347, शहादा-454, तळोदा-242, अक्कलकुवा-469 तर धडगाव तालुक्यातील 553 अंगणवाडय़ांच्या 1 लाख 32 हजार 852 बालकांनाही या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आह़े 
अंगणवाडी क्षेत्रात एक ते तीन वयोगटात 51 हजार 281, तीन ते पाच वयोगटात 52 हजार 606 तर पाच ते सहा वर्ष वयोगटात 28 हजार 965 बालकांचा समावेश आह़े अंगणवाडी सेविकांकडून या बालकांना गोळ्या वाटपाची तयारी पूर्ण करण्यात आली आह़े 
 


Web Title: 5 lakh children health campaign in Nandurbar district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.