18 जनावरांच्या अचानक मृत्यूने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:23 PM2017-08-18T12:23:07+5:302017-08-18T12:23:07+5:30

खापर येथील गोशाळेतील घटना : अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा

18 sudden sudden death of animals | 18 जनावरांच्या अचानक मृत्यूने खळबळ

18 जनावरांच्या अचानक मृत्यूने खळबळ

googlenewsNext
ठळक मुद्दे गोशाळेतील पिण्याच्या पाण्याच्या हौदात अज्ञात समाजकंटकाने विषारी औषध टाकून गायींना मारून टाकल्याचा आरोप असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी. - लुणकरण भन्साली, चेअरमन, भगवान महावीर गोशाळा, खापर

ऑनलाईन लोकमत
दिनांक 18 ऑगस्ट
खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ब्राrाणगाव शिवारातील भगवान महावीर गोशाळेतील 11  गायी, सहा बैल व एक म्हैस असे एकूण 18 जनावरे गुरूवारी मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घातपात झाल्याच्या अवफेने खापर येथील बाजारपेठ बंद करण्यात आली होती. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
ब्राrाणगाव रस्त्यालगत महावीर गोशाळा असून, या गोशाळेत 140 जानावरे आहेत. या जनावरांना ठेवण्यासाठी दोन पक्के शेड आहे. त्यालगत तार कम्पाऊंड केलेल्या जागेतील काही जनावरांनी सायंकाळी टाकलेला हिरवा चारा खाल्ल्याने सकाळी पोट फुगलेले, तोंडातून फेस येत असलेल्या स्थितीत जनावरे आढळून आल्याने येथील कर्मचा:यांनी गोशाळेचे चेअरमन लुणकरण भन्साली यांना घटना सांगितली. त्यांनी अक्कलकुवा पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होवून मृत जनावरांचा पंचनामा केला.
घटनास्थळी अक्कलकुवा येथील सहायक पशुधन आयुक्त डॉ.सुजित कोलंगण, खापरचे पशुधन               विकास अधिकारी डॉ.एन.बी. चव्हाण, परिचर बी.के. पवार, एन.आर. माळी, आर.एस. फुलपगारे यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन करून जनावरांना खाऊ घातलेला चारा, हौदातील पाण्याचा नमुना         घेवून पंचनामा करण्यात आला           आहे. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तापसिंग प्रधान, तलाठी राजेश मोहिते यांनीही पंचनामा         केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी घटनास्थळी भेट देवून नंदुरबार पोलीस दलातील पशुवैद्यकीय युनिटला पाचारण करून मृत जनावारांचा पंचनामा केला आहे. चारा, पाणी व तत्सम गोष्टींचा पंचनामा करून घटनेचा तपास केला जात आहे. मृत जनावरांची किंमत दोन लाख 24 हजार  आकारण्यात आली  आहे.
घटनेची माहिती मिळताच सरपंच मोहनलाल जैन, प्रेमचंद्र जैन, लुणकरण भन्साली, अशोक जैन, अरविंद जैन, ललीत जाट, गोरख सागर, लक्ष्मण वाडीले, जोलू          वळवी, अक्कलकुव्याचे माजी           सरपंच प्रेमचंद जैन, विश्वास मराठे यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून मृत जनावरांना परिसरातच जेसीबीद्वारे खड्डा खोदून दफन करण्यात आले

Web Title: 18 sudden sudden death of animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.