नंदुरबारात 17 हजार शेतक:यांना विम्याची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:18 PM2018-04-14T13:18:37+5:302018-04-14T13:18:37+5:30

रब्बीत 347 शेतकरी समाविष्ट : विमा कंपनीचा अहवाल लांबल्याने समस्या

17 thousand farmers in Nandurbar: waiting for insurance | नंदुरबारात 17 हजार शेतक:यांना विम्याची प्रतिक्षा

नंदुरबारात 17 हजार शेतक:यांना विम्याची प्रतिक्षा

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 14 : जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात 14 हजार शेतक:यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता़ या शेतक:यांच्या विम्याला वर्ष उलटूनही मंजूरी मिळालेली नसल्याने परताव्याची रक्कम मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आह़े   
गेल्या खरीप हंगामात ज्वारीचे बोगस बियाणे, बोंडअळी आणि सरासरीपेक्षा कमी पजर्न्यमान यातून शेतक:यांना अनुत्पादकेता फटका बसला होता़ यातून सावरण्यासाठी शेतक:यांनी शासन नियमानुसार पीककर्ज घेत असतानाच पीक विमा केला होता़ गेल्या वर्षात झालेल्या विमाधारकांचे सव्रेक्षण संबधित विमा कंपन्यांनी केल्याची माहिती होती़ यामुळे शेतक:यांना विमा लाभ मिळण्याची शक्यता होती़ मात्र यंदाचा खरीप हंगाम सुरू होण्याची वेळ येऊनही विमा मंजूर झालेला नाही़ मंजूरी देण्याबाबत कार्यवाहीच झालेली नसल्याने जिल्ह्यातील 17 हजार शेतकरी विम्याच्या प्रतिक्षेत आहेत़ गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील 14 हजार 717 शेतक:यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होत़े यापोटी 2 कोटी 78 लाख 97 हजार 326 रूपयांची रक्कम  बँकांमध्ये जमा झाली होती़ बँकांनी रक्कम कपात केल्यानंतर शेतकरी आपोआप विमा योजनेत सामील झाले होत़े यानंतर ठिकठिकाणी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतशिवारात पीकांचे सव्रेक्षण केले होत़े यात बोंडअळीमुळे नुकसान झालेला कापूस आणि बोगस बियाण्यामुळे नुकसान झालेली 9 नंबर ज्वारीचाही समावेश होता़ नुकसान झाल्यावर हेक्टरी 7 हजार्पयत विमा परतावा निश्चित झाल्याने शेतकरी समाधानी होत़े परंतू विमा कंपन्यांनी कामकाज लांबवल्याने अद्यापही बँकांमध्ये विमा रक्कम जमा झालेली नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत़ विम्याची रक्कम बँकेत जमा करण्यात येणार असल्याने बोगस बियाण्यामुळे नुकसान झालेले शेतकरी त्रस्त आहेत़ 
जिल्ह्यात खरीप सोबतच यंदा रब्बी उत्पादनांचाही शेतक:यांनी विमा उतरवला आह़े खरीपच्या तुलनेत केवळ 347 शेतक:यांनी विमा केला असून यातून आठ लाख 64 हजार रूपये बँकेत जमा करण्यात आले आहेत़ या शेतक:यांचे अद्याप सव्रेक्षण शिल्लक आह़े जिल्ह्यात यंदा 90 हजार हेक्टर कापसावर बोंडअळी पडल्याने शेतक:यांचे नुकसान झाले होत़े बोंडअळी नैसर्गिक आपत्तीच्या सं™ोत येत असल्याने बोंडअळी ग्रस्त शेतक:यांना थेट विमा संरक्षण मिळाले आह़े आधीच तिहेरी मदत जाहिर झालेल्या शेतक:यांना विमा परतावाही मिळणे शक्य असल्याने त्यांची समस्या दूर होणार होती़ परंतू विमा कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याने बोंडअळी ग्रस्त कापूस उत्पादक द्विधा मनस्थितीत आहेत़ बोंडअळीचे पंचनामे पूर्ण करण्यात येऊन त्याचा अहवाल संबधित विमा कंपन्यांना देऊनही त्यांच्याकडून कारवाई झालेली नसल्याने नाराजी आह़े विशेष म्हणून 90 टक्के कापूस उत्पादक शेतक:यांनी पिक विमा केला आह़े विकासो संस्था आणि जिल्हा बँक यांच्याकडून कर्ज घेतले असल्याने विम्याची रक्कम त्यांच्या कर्जातून आधीच कपात करण्यात आली आह़े  
विमा कंपनीकडून तपासणी करण्यात येणा:या सात वर्षातील पिकाच्या सरासरीत गेल्या सहा वर्षाचे आकडे हे निराशाजनक आहेत़ यामुळे शेतक:यांना वाढीव विमा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े शेतक:यांना उत्पादन खर्चाच्या 60 टक्के रक्कम विम्याच्या रूपाने परतावा म्हणून मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आह़े गेल्या खरीप हंगामात पीक विमा योजनेत जिल्ह्यातील साधारण 1 लाख 10 हजार हेक्टरवरील पिके समाविष्ट करण्यात आली होती़ यात  मका, ज्वारी, कापूस, सोयाबीनसह इतर पिकांचा समावेश होता़ 
नैसर्गिक आपत्तीचे संकट दरवर्षी कायम असल्याचे गृहित धरून शेतकरीही पिक विम्यात सहभाग वाढत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आह़े 
 

Web Title: 17 thousand farmers in Nandurbar: waiting for insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.