12 शेतक:यांच्या वारसांना मिळाला विमा योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:08 PM2019-06-16T12:08:57+5:302019-06-16T12:09:02+5:30

भूषण रामराजे ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अपघाती मृत्यू झाल्याने निराधार होणा:या शेतक:यांच्या वारसांसाठी राज्यशासनाने 2015-16 मध्ये गोपीनाथ ...

12 Beneficiaries of the insurance plan they got from the heirs of the farmer | 12 शेतक:यांच्या वारसांना मिळाला विमा योजनेचा लाभ

12 शेतक:यांच्या वारसांना मिळाला विमा योजनेचा लाभ

Next

भूषण रामराजे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अपघाती मृत्यू झाल्याने निराधार होणा:या शेतक:यांच्या वारसांसाठी राज्यशासनाने 2015-16 मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना पुर्नजिवित केली होती़ या योजनेतून गेल्या तीन वर्षात 12 मयत शेतक:यांच्या वारसांना लाभ मिळू शकला आह़े उर्वरित प्रकरणांवर चर्चा सुरु आह़े    
2009-10 या वर्षात तत्त्कालीन राज्य सरकारने शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरु केली होती़ व्यक्तीगत विमा योजनेचे नाव बदलून जनता अपघात विमा योजना सुरु करण्यात आली होती़ 2015-16 मध्ये या योजनेचे गोपीनाथ मुंडे  अपघाती विमा योजना असे नामकरण करण्यात आले होत़े पूर्वीच्या योजनेतील भरपाईची रक्कम 2 लाखांर्पयत करुन 12 प्रकारे अपघाती मृत्यू, अपंगत्त्व, डोळा निकामी होणे यासाठी 1 ते 2 लाख रुपयांची मदत शेतकरी किंवा त्यांच्या वारसांना करण्यात येणार होती़ 2016-17 या वर्षात नंदुरबार जिल्ह्यात घडलेल्या घटनांच्या आधारे मयत आणि अपघातग्रस्तांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या प्रस्तावांतर्गत कामकाज करण्यात आले होत़े तीन वर्षात प्राप्त झालेल्या एकूण 35 प्रस्तावांपैकी 12 प्रस्ताव निकाली काढल्यानंतर उर्वरित 23 प्रस्तावांचे कामकाज गत तीन वर्षापासून सुरु असल्याची माहिती आह़े  यातील दोन मयत शेतक:यांचे प्रस्ताव नाकारण्यात आल्याची माहिती आह़े तरीही उर्वरित 21 प्रस्ताव हे विमा कंपन्यांकडे पाठवण्यात आल्याने त्यावर योग्य ती कारवाई झालेली  नसल्याची माहिती आह़े हे प्रस्ताव लवकर निकाली काढण्याची मागणी आह़े  विशेष म्हणजे सर्व 21 प्रस्ताव हे मयत शेतक:यांच्या वारसांनी दाखल केले आहेत़ शेतक:यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी वेळोवेळी होणा:या बैठकीत कृषी विभाग विमा कंपन्यांना धारेवर धरत असून येत्या महिन्यात योजनेचे कामकाज पूर्ण होणार आह़े 
कृषी अधिक्षकांचा पाठपुरावा 
अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या योजनेत रस्ते अपघातात मृत पावणा:या शेतक:यांच्या वाहन परवान्याबाबत अडचणी येतात़ राज्य कृषी विभागाच्या बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ़ बी़एऩपाटील यांनी परवाने जुने किंवा मुदतबाह्य असल्याचा मुद्दा मांडून शेतक:यांची अडचण सांगितली होती़ त्यावर शासन दखल घेणार असल्याची माहिती असून वाहन परवान्याबाबत नियम शिथिल होऊ शकतो़ 

2018-19 या वर्षात अद्याप एकही प्रस्ताव दाखल करण्यात आलेला नसला तरी 2017-18 या वर्षात विविध प्रकारे अपघाती मृत्यू आलेल्या 18 शेतक:यांचे प्रस्ताव देण्यात आले होत़े यातील आठ प्रस्ताव त्रुटींमुळे पडून असल्याची माहिती आह़े तर नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील  2 धामडोद, भालेर येथील 3, अक्राळे, नळवे खुर्द, ससदे आणि कौली ता़ शहादा येथून दाखल झालेल्या प्रत्येक 1 अशा 10 प्रस्तावांवर अद्यापही कारवाई झालेली नाही़ रस्ते अपघात, इलेक्ट्रीक शॉक, बुडून तसेच गाईच्या हल्ल्यात हे शेतकरी मृत्यूमुखी पडल्याची माहिती आह़े कृषी विभागाने आलेले प्रस्ताव विमा कंपनीकडे दिल्यानंतर त्यावर कामकाज सुरु असल्याचे सांगण्यात आले आह़े 2016-17 या वर्षात कृषी विभागाकडे 17 प्रस्ताव दाखल करण्यात आले होत़े यात 1 प्रस्तावात त्रुटी असल्याने तो बाजूला ठेवण्यात आला़ तर दोघांवर कारवाई सुरु ठेवण्यात येऊन 12 वारसांना दोन लाख रुपयांर्पयत मदत देण्यात आली़ यात भारकुंड, जांगठी, मोलगी, सल्लीबार, रोझकुंड ता़ अक्कलकुवा, भोणे ता़ नंदुरबार, मोरवड ता़ तळोदा, डोंगरगाव, मंदाणे ता़ शहादा, वावडी, वराडीपाडा ता़ नवापुर येथील वारसांचा समावेश आह़े या वर्षात होराफळी ता़ अक्कलकुवा आणि श्रीरामपूर ता़ नंदुरबार येथील दोघांचे प्रस्ताव नाकारले गेल़े वय अधिक व वाहन परवान्याअभावी हे प्रस्ताव नाकारले गेले आहेत़ 
 

Web Title: 12 Beneficiaries of the insurance plan they got from the heirs of the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.