अक्कलकुवा येथे युवतीचा विनयभंग करणाऱ्यास १ वर्षाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:32 AM2019-03-20T11:32:45+5:302019-03-20T11:33:05+5:30

कारावास : अक्कलकुवा न्यायालयाचा निकाल

 1 year sentence for molestation of girl in Akkalkuwa | अक्कलकुवा येथे युवतीचा विनयभंग करणाऱ्यास १ वर्षाची शिक्षा

अक्कलकुवा येथे युवतीचा विनयभंग करणाऱ्यास १ वर्षाची शिक्षा

Next

नंदुरबार : कौली ता़ अक्कलकुवा येथे युवतीचा विनयभंग करणाऱ्यास अक्कलकुवा न्यायालयाने १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली़
कौली येथील इंद्रसिंग दौलत तडवी याने १४ फेब्रुवारी २०१७ रोजी रात्री आठ वाजेच्या गावातीलच युवतीला एकटे गाठून शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला होता़ यावेळी युवतीने प्रतिकार केला करत घराकडे धाव घेतली होती़ घरी आल्यानंतर तिने हा प्रकार चुलत भावांना कथन केला़ घटनेनंतर पिडीतेने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत यांनी अक्कलकुवा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए़डी़ करभजन यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ न्यायमूर्ती करभजन यांनी साक्षी पुरावे तपासून इंद्रसिंग दौलत तडवी यास दोषी धरुन १ वर्षाचा कारावास, २ हजार ५०० रुपये दंड, कोर्ट संपेपर्यंत शिक्षा आणि ५ हजार रुपये पिडित फिर्याद देण्याचे आदेश दिले आहेत़ खटल्याचे कामकाज सरकारी वकील अजय सुरळकर यांनी पाहिले़ पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीदान राऊळ यांनी कामकाज पाहिले़ दोघांचा पोलीस अधिक्षक संजय पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी गौरव केला़

Web Title:  1 year sentence for molestation of girl in Akkalkuwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.