नांदेड जिल्ह्यात पोलिसांच्या मारहाणीनंतर तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:22 AM2018-09-08T00:22:51+5:302018-09-08T00:23:47+5:30

शहरानजीक असलेल्या तामसा तांडा येथील अवैध दारुविक्री विरोधात पोलिसांनी छापा मारुन तरुणास बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर २५ वर्षीय दारु विक्रेत्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ७.३० वाजता घडली. या प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी दोन तासांपासून सदर युवकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले आहे.

The youth suicides after the police assault in Nanded district | नांदेड जिल्ह्यात पोलिसांच्या मारहाणीनंतर तरुणाची आत्महत्या

नांदेड जिल्ह्यात पोलिसांच्या मारहाणीनंतर तरुणाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देकारवाईच्या मागणीसाठी नातेवाईक पोलीस ठाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : शहरानजीक असलेल्या तामसा तांडा येथील अवैध दारुविक्री विरोधात पोलिसांनी छापा मारुन तरुणास बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर २५ वर्षीय दारु विक्रेत्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ७.३० वाजता घडली. या प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी दोन तासांपासून सदर युवकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले आहे.
तामसा शहराच्या वॉर्ड क्र. ६ मधील तामसा तांडा प्रसिद्ध आहे. या तांड्यात २५ ते ३० घरांची वस्ती आहे. येथीलच लहू लक्ष्मण आडे हा २५ वर्षीय तरुण शहरातून देशी दारु आणून त्याची अवैधरित्या या तांड्यावर विक्री करतो. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास पोलिसांनी या तांड्यावर छापा मारला. यावेळी लहू आडे हा दारु विक्रेता येथे आढळून आला. पोलीस आणि लहू आडे यांच्यामध्ये वाद होवून त्याचे पर्यावसान बाचाबाचीत झाले. आडे पोलिसांशी बाचाबाची करु लागल्याने संतापलेल्या पोलीस पथकाने त्यास बेदम मारहाण केली. यावेळी तांड्यावरील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मारहाणीनंतर अपमान सहन न झाल्याने लहू आडे यांनी विषारी औषध प्राशन केले. याची माहिती मिळताच जवळच्या नागरिकांनी त्याला रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती हदगाव शहरात समजल्यानंतर नागरिकांसह मयत लहू आडे याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेवून तेथे ठाण मांडले. सदर तरुणास मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाºयाविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी या जमावाची मागणी आहे. या मागणीसाठी रात्री उशिरापर्यंत मयताच्या नातेवाईकांसह नागरिकही पोलीस ठाणे परिसरात थांबून होते. पोलिसांकडून मध्यस्थी करुन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरू होता. मयत आडे यास आईवडील, भाऊ, एक मुलगी असून त्याची पत्नी गरोदर आहे.

इतके दिवस दारुविक्री बिनबोभाट होती सुरू
तामसा शहरानजीकच्या या तांड्यावर मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू होती़ मग आताच पोलिसांनी कारवाई करत दारू विक्रेत्यास बेदम मारहाण का केली ? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे़
यापूर्वी पोलिसांच्या आशीर्वादानेच हा अवैध व्यवसाय सुरू तर नव्हता ना आणि केवळ चिरीमिरी देण्यातून तरूणाला मारहाण तर झाली नाही ना ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून कारवाईची मागणी होत आहे़

Web Title: The youth suicides after the police assault in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.