रेती उत्खननामुळे पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:14 AM2019-03-18T00:14:39+5:302019-03-18T00:15:42+5:30

बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरातील माचनूर, गंजगाव, कार्ला (बु.), येसगी, बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपात्रातील घाटातून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे़ त्यामुळे बिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे़

Water scarcity crisis due to quarrying | रेती उत्खननामुळे पाणीटंचाईचे संकट

रेती उत्खननामुळे पाणीटंचाईचे संकट

Next
ठळक मुद्देमांजरा नदीपात्रातील रेती उत्खननास परवानगीबिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

सगरोळी : बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरातील माचनूर, गंजगाव, कार्ला (बु.), येसगी, बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपात्रातील घाटातून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे़ त्यामुळे बिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे़
मांजरा नदीपात्रातील विहिरींद्वारे १२ किमी अंतरावर असलेल्या बिलोली शहरासह जवळपास ५० किमी क्षेत्रात असलेल्या सगरोळी परिसरासह बडूर हिंगणी, चिंचाळा, लघूळ, बोळेगाव या पाच गावांची तहान भागविली जाते. या ठिकाणाहून रेती उत्खननामुळे या सर्व गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. सार्वजनिक पाणीपुरवठा ठिकाणापासून काही अंतरावर रेती उत्खननास परवानगी देऊ नये, असा नियम असतानाही रेती उत्खननाची परवानगी दिल्याने पर्यावरण क्षेत्रातील काही व्यक्ती, संस्थाकडून नाराजी व्यक्त होत आहे.
सगरोळीसह परिसरातील मांजरा नदीपात्रात बोळेगाव हद्दीतील ३३५ गट नंबरमध्ये बिलोली शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या चार तर बडूर विभागातील पाच गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत दोन अशा एकूण सहा विहिरींद्वारे पाणीपुरवठा होतो.
कार्ला बु., नागणी, माचनूर, गंजगाव, सगरोळी मांजरा नदीपात्रातून त्या- त्या गावासह तालुक्यातील एक लाख लोकांची तहान भागविली जाते. १५ वर्षांपासून मांजरा नदी पात्रातील याच गावातील वाळू घाटातून बेसुमार रेती उत्खनन होत आहे.
नदीतील जलचर , वनस्पती झाल्या नष्ट
नियमित रेती उत्खननामुळे नदीचे पात्र बदलले असून नदीतील जलचर तथा आवश्यक असणाऱ्या वनस्पती नष्ट झाल्या असून त्याची जागा आता काटेरी, विषारी व अनावश्यक वनस्पतींनी घेतली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे जैविक व रासायनिक पाणी परीक्षण अहवाल पाहिल्यास पाण्यामध्ये नायट्रेट, फ्लोराईड व टीडीएस मोठ्या प्रमाणात असून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात स्पष्ट दिसून येते. परिसरातील पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीच जाहीर केले असून दूषित पाण्यामुळे परिसरात फ्लोरोसिस आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याचेही शासकीय रुग्णालयांच्या आकडेवाडीवरून स्पष्ट होते.
पाणीटंचाईस कोण जबाबदार ?
बिलोली शहरासह इतर ठिकाणी होणा-या पाणी पुरवठ्याच्या विहिरी बिलोली नगर परिषद तर सगरोळी व बडूर विभाग पाणीपुरवठ्याच्या विहिरी या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मालकीच्या आहेत. रेती उत्खननाचा वाईट परिणाम भविष्यात पाणीपुरवठ्यावर झाला तर त्यास जबाबदार कोण? हा प्रश्न असून यासाठी ग्रामपंचायत, नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने रेती उत्खननास विरोध करावा, परंतु तसे होताना दिसत नाही.

Web Title: Water scarcity crisis due to quarrying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.