हॉटेलातील पाणी हवंय ? चहा, नाश्त्याची आॅर्डर द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:24 AM2018-05-16T00:24:15+5:302018-05-16T00:24:15+5:30

वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़

Want water? first order Tea, breakfast! | हॉटेलातील पाणी हवंय ? चहा, नाश्त्याची आॅर्डर द्या!

हॉटेलातील पाणी हवंय ? चहा, नाश्त्याची आॅर्डर द्या!

googlenewsNext
ठळक मुद्देकिनवट तालुक्यातील मांडवी भागात दोन भांडे पाण्यासाठी रात्रीचा जागर

विश्वास कांबळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मांडवी : वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़
नळयोजना नसलेल्या कोठारी, नागापूर, लिंगी, निराळा, भिलगाव, जरूर खेडी या गावांचा पाणीप्रश्न दिवसागणिक बिकट बनत आहे़ संभाव्य पाणी बळी टाळण्यासाठी या प्रस्तुत गावांत पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे़ तर राज्यपाल दत्तकगाव जावरला व घाटमाथ्यावरील मोहाडा येथील टँकरचा मंजूर प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे़ सध्या या भागातील परसराम ना़ तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ कडक उन्हाळा दोन महिने बाकी आहे़ ठिकठिकाणचा पाणीप्रश्न तातडीने हाताळला नाही तर पाण्यासाठी मांडवी भागात सर्वत्र हाहाकार उडण्याची शक्यता आहे.
अधिक मासात रखरखणारे ऊन अधिकाधिक वाढत आहे़ अशात पळशी, रामजी ना़ तांडा, लिमगुडा, सिंगोडा, रायपूर तांडा, पळशी तांडा, उमरी बा़, सुभाषनगर, गणेशपूर, सिरपूर, मांडवी, कनकी, लक्ष्मीनगर आदी लोकवस्तीच्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकर्षाने भेडसावत आहे़ कर्मचारी वर्गांनी कुटुंब गावाकडे स्थलांतरित केले आहे़

कमी पावसाचा फटका
यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने नदी-नाले धो-धो वाहिले नाही़ सिरपूर, मांडवी, दरसांगवी, भिलगाव हे बृहद लघुप्रकल्प काठोकाठ भरले नाहीत़ आजमितीस हे प्रकल्प कोरडे पडल्यात जमा आहे़ भूगर्भातील पाणीपातळी खोलवर गेली़ ५०० फूट बोअर करूनही पाणी लागत नाही़ गावशिवारात जुन्या काळातील ज्या एक-दोन विहिरी आहेत, तेथेच दिवसरात्र पाण्यासाठी झुंबड हे चित्र पहावयास मिळत आहे़

कोरड्या विहिरी खोल करून आडवे बोअर मारले़ त्यातून पाण्याचा निचरा होवून नागरिकांना पाणी मिळू लागले आहे़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा प्रयोग चालू केला - सय्यद, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, किनवट
ज्या गावात नळयोजना नाही, अशा ठिकाणी सर्वेक्षण करुन पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे- रेणुका जितेंद्र कांबळे, पं़स़ सदस्या़
आठवडी बाजारातील सौरऊर्जेवरील नळयोजना पूर्ववत सुरू करण्यासाठी तांत्रिक दुरुस्ती करण्यात येईल -पी़एम़आडे, ग्रामसेवक़
घरपोच पाणी ही सवय झालेल्या मंडळीची मात्र चांगलीच कोंडी होत आहे़ २०० रुपये मोजून बैलगाडीद्वारे येणारे पाणी आठवड्यात एकदा मिळत आहे़ या २०० लिटर पाण्यात गुजराण करणे खूप जिकिरीचे बनले आहे़ शेत शिवारातील ६० ते ७० फूट खोल विहिरीत तळाशी असलेल्या पाणी बादली भरून काढताना कसरत करावी लागत आहे़ जुनी-जाणती मंडळी भूतकाळातील पाणी व्यवस्था यावर भाष्य करीत आहेत. नवख्यांची मात्र फटफजिती होत आहे़

Web Title: Want water? first order Tea, breakfast!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.