पशुवैद्यकीय दवाखान्यांना आली अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:42 AM2019-05-17T00:42:39+5:302019-05-17T00:45:31+5:30

तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने या दवाखान्यांना अवकळा आली आहे़ कारेगाव, चिचोंली, करखेली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शौचालय बंद अवस्थेत असून जारीकोट व धर्माबाद पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारती मोडकळीस आली आहे़

Veterinary dispensaries slow down in nanded | पशुवैद्यकीय दवाखान्यांना आली अवकळा

पशुवैद्यकीय दवाखान्यांना आली अवकळा

googlenewsNext
ठळक मुद्देधर्माबाद तालुका : इमारती बनल्या धोकादायकशौचालय, पाण्याची असुविधा, औषधींचा तुटवडा

धर्माबाद : तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने या दवाखान्यांना अवकळा आली आहे़ कारेगाव, चिचोंली, करखेली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शौचालय बंद अवस्थेत असून जारीकोट व धर्माबाद पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारती मोडकळीस आली आहे़ त्यामुळे पशु रूग्ण व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे़
धर्माबाद शहरात तालुका लघु पशुवैद्यकीय चिकीत्सालय राज्यस्तरीय दवाखाना असून ग्रामीणमध्ये जारीकोट, करखेली, चिचोंली व कारेगाव येथे चार जिल्हा परिषद गट अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. करखेली, कारेगाव, चिचोंली सोडले तर धमार्बाद, जारिकोट येथील पशुवैद्यकीय दवाखानाचा इमारती जुन्या झाल्या असून त्या मोडकळीस आल्या आहेत. सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात पाणी, शौचालय, कंपाऊड वॉलची व्यवस्था नाही. जनावरांसाठी हौद तसेच चाºयाची व्यवस्था कुठेच नाही. लस ठेवण्यासाठी शीतयंत्र असून नसल्यासारखे आहे. जारीकोट येथे शीतयंत्र नाही. त्यामुळे औषध लवकर खराब होतात. जारीकोट येथे फ्रीज नसल्याने धर्माबाद येथील दवाखान्यात लस ठेवले जाते. प्रत्येक दवाखान्यात शीतयञांची आवश्यकता आहे. काही दवाखाने नावालाच असुन पशुवैद्यकीय अधिकारी केव्हा येतात केव्हा जातात याचा पत्ताच नसतो़ मुख्यालय ठिकाणी अधिकारी राहत नसून धर्माबादहून ये-जा करतात. जनावरांना कुत्रा, साप चावल्यास त्या औषधांचा तुटवडा आहे. करखेली येथील पशुवैद्यकीय अधिकारी पंधरा पंधरा दिवस येत नसल्याच्या तक्रारी आहेत़ धर्माबाद तालुक्यातील ५१ गावामध्ये गाय, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या असे ४३ हजार ६६४ पशू आहेत.
शहरातील तालुका लघु पशुवैद्यकीय चिकीत्सालय राज्यस्तरीय दवाखाना हा १९५६ पासून जिल्हा परिषदेच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या जागेत आहे. ही इमारत कधी पडेल यांची शाश्वती नाही. धर्माबाद, रामेश्वर, रामपुर, आतकुर, पेरली, बाभळी, मंगनाळी, पाटोदा (थ) बन्नाळी, सिरसखोड, शेळगाव (थ), मोकली, माष्ठी, बामणी, मनूर, ईळेगाव व संगम सतरा गावे असून या दवाखाना अंतर्गत १२ हजार ८०१ पशू आहेत़ गायी ५१९५, म्हशी १४७८, मेंढ्या १२६१, शेळ्या १२७०, कोंबडे ३५९७ असे एकूण १२८०१ पशू आहेत. या दवाखान्यात सहाय्यक आयुक्त व परिचर असे दोन पदे रिक्त आहेत. पाणी, शौचालयाची व्यवस्था नाही. सध्या नविन इमारत बाधंकामास मंजुरी मिळाली असून जागेस मंजुरी न मिळाल्याने निधी अडकला. येथे वॉचमॅनचे पद मान्य नसून रात्रीला कोणीच नसल्याने दवाखाना परिसरात मद्यशोकीनवाले दारू पितात़
कारेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक २००५ मध्ये अस्तित्त्वात आला़या ठिकाणी पाणी व्यवस्था नसल्याने शौचालय बंद आहे़ कपाउंड व पाणी नसल्याने जनावर रुग्णांची गैरसोय होत आहे. या दवाखान्या अंतर्गत कारेगाव, बेलगुजरी, पिपंळगाव, हारेगाव, सालेगाव, आटाळा, यल्लापुर असे सात गावाचा समावेश आहे. या श्रेणी अंतर्गत गायी २६४७, म्हशी ८२१, शेळ्या ९५२, मेंढी १, कोंबड्या १७२६ असे एकूण ६१४७ पशु आहेत़
जारीकोट येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन हे फार जुनी इमारत असुन मोडकळीस झाली आहे. या अंतर्गत जारीकोट, पाटोदा(बु), पाटोदा(खु), रोशनगाव, दिग्रस, चोंडी, सायखेड, चोळाखा असे आठ गावाचा समावेश असून या ठिकाणी गायी ३२८६, म्हशी ११४७, शेळ्या ४१०, मेंढ्या ६८७, कोंबड्या २९६५ असे एकूण ८४९५ पशू आहेत. या दवाखान्याची ईमारत फार जुनी असुन भिंतींना भेगा पडलेले असुन राहाणे अवघड आहे पाणी शौचालयाची व्यवस्था नाही.
धर्माबाद शहरात राज्यस्तरीय दवाखाना
धर्माबाद शहरात तालुका लघु पशुवैद्यकीय चिकीत्सालय राज्यस्तरीय दवाखाना एक असून ग्रामीणमध्ये जारीकोट, करखेली, चिचोंली व कारेगाव येथे चार जिल्हा परिषद गट अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.
करखेली, कारेगाव, चिचोंली सोडले तर धमार्बाद, जारिकोट येथील पशुवैद्यकीय दवाखानाचा इमारती जुन्या झालेले असून मोडकळीस आलेले आहेत. सर्वच दवाखान्यात पाणी, शौचालय, कंपाऊडवॉलची व्यवस्था नाही.
मुलभूत सुविधांचा अभाव
कारेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक २००५ मध्ये अस्तित्त्वात आला असून पाणी व्यवस्था नसल्याने शौचालय बंद अवस्थेत आहेत़ कपाउंडसुध्दा नाही, पाणी नसल्याने जनावर रुग्णांची गैरसोय होत आहे.
या अंतर्गत कारेगाव, बेलगुजरी, पिपंळगाव, हारेगाव, सालेगाव, आटाळा, यल्लापुर असे सात गावाचा समावेश आहे. या श्रेणी अंतर्गत गायी २६४७, म्हशी ८२१, शेळ्या ९५२, मेंढी १, कोंबड्या १७२६ असे एकूण ६१४७ पशु आहेत़

मागच्या वेळेस निधी मंजूर झाला होता़ पण जागेचे संक्शन न झाल्यामुळे निधी थाबंला़ त्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली़ यंदाच्या आर्थिक वर्षात निधी मंजूरी मिळेल
-आऱ एल़ पडगीलवार, धर्माबाद तालुका लघु पशुवैद्यकीय चिकीत्सालय,पशुवैद्यकीय अधिकारी़

Web Title: Veterinary dispensaries slow down in nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.