The University has stopped funding for 5 months from funding | मुक्त विद्यापीठाने निधी देऊनही प्राध्यापकांचे मानधन ५ महिन्यांपासून रखडले
मुक्त विद्यापीठाने निधी देऊनही प्राध्यापकांचे मानधन ५ महिन्यांपासून रखडले

ठळक मुद्दे नाशिक विद्यापीठाने विभागीय केंद्राला १ कोटी ४० लाखाचा निधी देवूनही मानधन न मिळाल्याने एवढा निधी कुठे खर्च केला असा प्रश्न निर्माण झाला आहे़मूक्त विद्यापीठाचे  गत दोन वर्षापासून पेपर मूल्यांकनाचे काम आॅनलाईन पद्धतीने सुरू आहे़ नांदेड विभागात २९ तपासणी केंद्रात जवळपास १ हजार ५०० समंत्रक प्राध्यापकांनी मूल्यमापनाचे काम केले.

नांदेड:  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मूक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्रात आॅनलाईन पेपर मूल्यांकन केलेल्या संमत्रक आणि केंद्राना गत पाच महिन्यापासून  मानधन मिळाले नाही़ नाशिक विद्यापीठाने विभागीय केंद्राला १ कोटी ४० लाखाचा निधी देवूनही मानधन न मिळाल्याने एवढा निधी कुठे खर्च केला असा प्रश्न निर्माण झाला आहे़ दरम्यान, ज्यांच्या काळात हा निधी मिळाला होता ते दोन्ही अधिकारी मात्र बदली करून गेल्याने या निधीची आता विद्यापीठ स्तरावर चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मूक्त विद्यापीठाचे  गत दोन वर्षापासून पेपर मूल्यांकनाचे काम आॅनलाईन पद्धतीने सुरू आहे़ नांदेड विभागातंर्गत हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील २९ तपासणी केंद्रात जवळपास १ हजार ५०० समंत्रक प्राध्यापकांनी मूल्यमापनाचे काम केले होते़ मात्र पेपर मूल्यांकन करून पाच महिन्याचा कालावधी लोटूनही मानधन मिळाले नाही़ विद्यापीठाने नांदेड विभागातील परिक्षेचे देयके व आॅनलाईन पेपर मूल्याकंनासाठी १ कोटी ४० लाखाचा निधीही दिला होता़ परंतु एवढा निधी तत्कालीन सहायक कुलसचिव यांनी कुठे व कोणत्या कामासाठी खर्च केला, हा प्रश्न उपस्थित झाला असून याच्या चौकशीसाठी समिती नेमल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नांदेड विभागातंर्गत हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील २९ तपासणी केंद्रात जवळपास १ हजार ५०० समंत्रक प्राध्यापकांनी मूल्यमापनाचे काम केले होते़ या सर्वांना मानधनाची प्रतीक्षा लागलेली असून विद्यापीठाने तातडीने मानधन अदा करावे, अशी मागणी होत आहे.

आठवडाभरात मानधन वितरित करु
पेपर मूल्यांकन व केंद्राची देयके काही तांत्रिक कारणामुळे संबंधितांना मिळू शकले नाहीत़ यापूर्वीचे अधिकारी बदली होवून दुसºया विभागात गेले आहेत़ त्यामुळे मानधन देण्यास विलंब झाला आहे़ मात्र पुढील आठवड्यात मानधन देण्यात येईल़ असे  विभागीय कार्यालयातील रवींद्र रनाळकर यांनी सांगितले.

आठ ते दहा दिवसात मिळेल 
आॅनलाईन पेपर मूल्याकंनाचे मानधन अद्याप मिळू शकले नाही़, ही वस्तुस्थिती आहे. विद्यापीठाने विभागासाठी दिलेल्या निधीचा हिशोब सादर करणे अद्याप बाकी आहे़ हा हिशोब व अनामत रक्कम यांचा ताळमेळ झाल्यानंतर येत्या आठ, दहा दिवसात तातडीने मूल्याकंनाचे मानधन देण्यात येणार आहे.
- अविनाश सरनाईक, विभागीय संचालक, मूक्त विद्यापीठ, नांदेड


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

संबंधित बातम्या

आविष्कार महोत्सवाची तयारी जोमात सुरू

आविष्कार महोत्सवाची तयारी जोमात सुरू

14 hours ago

सहस्त्रकुंड धबधब्यात पडून रेल्वे अधीक्षकाचा मृत्यू

सहस्त्रकुंड धबधब्यात पडून रेल्वे अधीक्षकाचा मृत्यू

15 hours ago

बोले सो निहाल, सत्श्री अकालचा जयघोष

बोले सो निहाल, सत्श्री अकालचा जयघोष

15 hours ago

आदित्य ठाकरे आजपासून नांदेडात

आदित्य ठाकरे आजपासून नांदेडात

15 hours ago

जिल्ह्यात केवळ २८ टक्के जलसाठा

जिल्ह्यात केवळ २८ टक्के जलसाठा

15 hours ago

विहिरीत पडून मजुराचा मृत्यू

विहिरीत पडून मजुराचा मृत्यू

1 day ago

प्रमोटेड बातम्या

नांदेड अधिक बातम्या

विष पाजलेल्या महिलेचा मृत्यू

विष पाजलेल्या महिलेचा मृत्यू

13 hours ago

किनवट, मांडवी बंदला प्रतिसाद

किनवट, मांडवी बंदला प्रतिसाद

13 hours ago

सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात

सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात

13 hours ago

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मंत्र्यांनी केला रद्द

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मंत्र्यांनी केला रद्द

13 hours ago

टाळे लागलेल्या आयुर्वेद व युनानी रसशाळेसाठी ३० लाख

टाळे लागलेल्या आयुर्वेद व युनानी रसशाळेसाठी ३० लाख

13 hours ago

नांदेड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

नांदेड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

1 day ago