नांदेडमध्ये स्वच्छता कामगारांना मिळाले गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:36 AM2018-08-14T00:36:24+5:302018-08-14T00:36:47+5:30

घाणीत उतरुन काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत आहे़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच महापालिका आणि संबधित कंपनीने त्याची दखल घेत सोमवारी स्वच्छता कामगारांना गणवेशासह हॅन्डग्लोज आणि मास्कचे वाटप केले़ स्वच्छतेचे काम करणाºया ८०० कामगारांना हे साहित्य मिळणार आहे़ त्यामध्ये महिला कामगारांचाही समावेश आहे़

Uniforms to cleaner workers in Nanded | नांदेडमध्ये स्वच्छता कामगारांना मिळाले गणवेश

नांदेडमध्ये स्वच्छता कामगारांना मिळाले गणवेश

Next
ठळक मुद्देलोकमत इफेक्ट : महिला कामगारांना साड्या, हॅन्डग्लोज, मास्कचेही वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : घाणीत उतरुन काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत आहे़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच महापालिका आणि संबधित कंपनीने त्याची दखल घेत सोमवारी स्वच्छता कामगारांना गणवेशासह हॅन्डग्लोज आणि मास्कचे वाटप केले़ स्वच्छतेचे काम करणाºया ८०० कामगारांना हे साहित्य मिळणार आहे़ त्यामध्ये महिला कामगारांचाही समावेश आहे़
शहरात स्वच्छतेची कामे करणारी महापालिकेची आणि आर अ‍ॅन्ड बी इन्फ्रा या कंपनीचे जवळपास ८०० कामगार आहेत़ या कामगारांवरच शहर स्वच्छतेची जबाबदारी आहे़ त्यासाठी सकाळी १० ते ५ या वेळेत घाणीत उतरुन हे कामगार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडत असतात़ परंतु त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीच खबरदारी प्रशासनाने घेतली नव्हती़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते़ त्यानंतर सोमवारी दुपारी महापालिका प्रशासन आणि आर अ‍ॅन्ड बी इन्फ्रा या कंपनीने प्रातिनिधीक स्वरुपात काही कामगारांना गणवेश, हॅन्डग्लोज आणि मास्कचे वाटप केले़ प्रत्येक पुरुष कामगाराला दोन गणवेश देण्यात आले आहेत़ तर महिला कामगारांना सहा वारी आणि नऊ वारी साड्या दिल्या आहेत़ कंपनीने यापूर्वीच या कामगारांना जॅकेट दिले आहेत़ ८०० कामगारांसाठी १६०० गणवेश आले असून उर्वरित कामगारांना त्याचे टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येणार आहे़
त्यामुळे मंगळवारपासून स्वच्छता कामगार आता गणवेशात दिसणार आहेत़ यावेळी कार्यक्रमाला महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार, सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक, गिता ठाकरे, मुख्य स्वच्छता निरिक्षक राजेंद्र गंदपवार, आर अ‍ॅन्ड बी इन्फ्राचे प्रमुख अशोकसिंह पाल, व्यवस्थापक अनिल इटकापल्ले यांची उपस्थिती होती़
---
तीन दिवस गणवेश घालणे बंधनकारक
स्वच्छता कामगारांनी आठवड्यातील सहा दिवस गणवेश घालणे अपेक्षित आहे़ परंतु किमान तीन दिवस गणवेश न घातल्यास त्यांचा अर्धा दिवसाचा पगार कापण्यात येणार आहे़ अशा सुचनाही यावेळी दिल्या़

Web Title: Uniforms to cleaner workers in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.