धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 01:19 AM2018-11-04T01:19:57+5:302018-11-04T01:20:14+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी ४ नोव्हेंबर रोजी होणार असून १८ जागांसाठी ६३ उमेदवारांचे भवितव्य बंद मतपत्रिकेत (बॅलेट पेपर) असून ६३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.

Today result of Dharmabad Agricultural Produce Market Committee | धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल

धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल

Next

धर्माबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी ४ नोव्हेंबर रोजी होणार असून १८ जागांसाठी ६३ उमेदवारांचे भवितव्य बंद मतपत्रिकेत (बॅलेट पेपर) असून ६३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.
एक सहाय्यक पोलीस अधीक्षक, एक पोलीस निरीक्षक, बारा सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, १२५ पोलीस कर्मचारी व आरपीसीच्या दोन तुकड्या असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे एकूण १७ असून १५ गण शेतकरी मतदाराचे असून पंधरा जागा आहेत. तर एक व्यापारी गण असून यात दोन जागा आहेत. एक गण हमाल मापाडी असून एक जागा आहे. असे एकूण १७ गणात १८ जागांसाठी ६३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.
कोणाचा पराभव होईल कोणाचा विजय होईल, हे आज कळणार आहे. रत्नाळी, बाळापूर, नायगाव (ध), पाटोदा (बु), आटाळा, करखेली, चिकना, येवती, आतकूर, आल्लूर व व्यापारीगणात प्रतिष्ठेची लढत झाली. कुठे संमिश्र लढत झाली तर बहुतांश गणांत अटीतटीची झाली आहे.

  • धर्माबाद नगरपालिका सभागृहात ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रथम पहिल्या गणापासून सुरु होणार आहे़ चार- चार टेबलावर मतमोजणी होणार असून उजव्या बाजूला एक गण व डाव्या बाजूला एक गण असे एका मागून एक दोन-दोन गण अशी मोजणी होणार आहे. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ सचिन खल्लाळ व सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडणार असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: Today result of Dharmabad Agricultural Produce Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.