अस्थी विसर्जनासाठी प्रयागराज येथे गेलेल्या नांदेडच्या तिघांचा बोट उलटून मृत्यू; पाचजण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:55 AM2018-12-11T10:55:31+5:302018-12-11T10:57:18+5:30

नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील तिघांचा मृत्यू झाला तर नावेतील 5 जण बेपत्ता झाले आहेत.

Three people in Nanded killed in boat accident at Prayagraj; Five missing | अस्थी विसर्जनासाठी प्रयागराज येथे गेलेल्या नांदेडच्या तिघांचा बोट उलटून मृत्यू; पाचजण बेपत्ता

अस्थी विसर्जनासाठी प्रयागराज येथे गेलेल्या नांदेडच्या तिघांचा बोट उलटून मृत्यू; पाचजण बेपत्ता

Next
ठळक मुद्दे समिती सदस्य रमेश बैंस यांच्या आईच्या अस्थिविसर्जनासठी एकूण 14 जण गेली होती.. प्रयागराज येथील कीडगंज येथील सरस्वती घाटावर सोमवारी सायंकाळी नाव उलटली.

नांदेड : अस्थी विसर्जनासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गेलेल्या नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील तिघांचा मृत्यू झाला तर नावेतील 5 जण बेपत्ता झाले आहेत. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. बेपत्ता व्यक्तींचा मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरु असल्याची माहिती प्रयागराज येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्याना कळवली आहे.

कोलंबी ता. नायगाव येथील बैस कुटुंबीय उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माजी पंचायत समिती सदस्य रमेश बैंस यांच्या आईच्या अस्थिविसर्जनासठी एकूण 14 जण गेली होती. प्रयागराज येथील कीडगंज येथील सरस्वती घाटावर सोमवारी सायंकाळी नाव उलटली. यात कोलंबी येथील भागाबाई बळीराम (65) , राधाबाई (55 ) आणि लक्ष्मीबाई केशवराज (55) या तीन महिलांचा मृत्यु झाला. त्यांचे मृतदेह सापडले आहेत.

त्याचवेळी या घटनेत दिंगबर रामराव बैस (72), बालाजी दिगंबर( 50), रमाकांत दिगंबर (40) आणि देवीदास नारायण कछवे  (55) हे चौघेजण बेपत्ता आहेत.  या घटनेत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील भोजराज घनश्याम (70) वर्ष हेही बेपत्ता आहेत. नावेत एकूण 14 व्यक्ति होत्या. त्यात कोलंबी येथील मनोहर माणिकराव ( 32 ) आणि  चंद्रपूर येथील मीनाक्षी रोशन पटवार ( 38 ) यांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे.

या घटनेत पाण्यातून बाहेर काढलेल्या कोलंबी येथील येथील सुनीता देवीदस कछवे  (50) , ज्योती बालाजी  (45) तसेच अहमदपूर येथील अंगद नारायण कछवे (47) आणि केशव कछवे (70) यांच्यावर एसआरएन  रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नांदेड जिल्ह्यातील बेपत्ता असलेल्या व्यक्तीबाबत प्रयागराज प्रशासन नांदेड जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या संपर्कात असल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

Web Title: Three people in Nanded killed in boat accident at Prayagraj; Five missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.