गुजरातशिवाय राजकारणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:34 AM2018-06-25T00:34:19+5:302018-06-25T00:34:51+5:30

प्लास्टिकबंदी ही पर्यावरण रक्षणासाठी करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीला विरोध करण्याचे काही कारणच नाही. मात्र काही लोकांना गुजरातचे नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही, अशी अप्रत्यक्ष टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर केली.

There is no politics except Gujarat | गुजरातशिवाय राजकारणच नाही

गुजरातशिवाय राजकारणच नाही

Next
ठळक मुद्देधावता दौरा : भाजप प्रदेशाध्यक्षांनी घेतली बुथगठन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : प्लास्टिकबंदी ही पर्यावरण रक्षणासाठी करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीला विरोध करण्याचे काही कारणच नाही. मात्र काही लोकांना गुजरातचे नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही, अशी अप्रत्यक्ष टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे हे रविवारी अचानकपणे नांदेडला आले. नांदेडमध्ये त्यांनी भाजपाच्या बुथगठन संदर्भात प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बैठकीनंतर ‘लोकमत’शी बोलताना दानवे म्हणाले, एक बुथ २५ युथ अशी भाजपाची बुथरचना राहणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. राज्यभर बुथगठनचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आपण राज्याच्या दौऱ्यावर आहे. परभणीनंतर नांदेडचा आढावा घेतला. सोमवारी औरंगाबादमध्ये असल्याचेही ते म्हणाले. प्लास्टिकबंदी निर्णयाला भाजपाचा विरोध असण्याचे कारण नाही.
पर्यावरणाच्या दृष्टीने राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. गुजरातमधून राज्यात सर्वाधिक प्लास्टिक येते, असे पर्यावरणमंत्री कदम यांनी म्हटले होते. त्याबाबत दानवे म्हणाले, गुजरातचे नाव घेतल्याशिवाय अनेकांचे राजकारणच होत नाही. राज्यात प्लास्टिक गुजरातमधून येवो अथवा कोठूनही येवो त्यावर शासन निश्चितपणे कारवाई करेल. भाजपा या निर्णयाच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते संदर्भातील विषयात प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आपल्यापर्यंत हा विषय आतापर्यंत आलाच नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर भाजपाच्या गुरप्रितकौर सोडी यांची नियुक्ती करण्यासंदर्भात महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी पत्र दिले. त्यानंतरही नियुक्ती झाली नाही.
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा विषय निकाली काढण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या होत्या. असे असले तरीही आजही नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर नेमणूक झालीच नाही. उलट विरोधीपक्ष नेते कक्षाला सील ठोकण्यात आले आहे. याबाबत आपण माहिती घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, भाऊराव देशमुख, आ. तुषार राठोड, संजय कौडगे, दिलीप कंदकुर्ते, डॉ. अजित गोपछडे, प्रवीण साले, चैतन्य देशमुख, स. दिलीपसिंघ सोडी, बाळासाहेब पांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: There is no politics except Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.