लायगो प्रकल्पामुळे अनेक संधी होणार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:12 AM2019-06-19T00:12:34+5:302019-06-19T00:13:51+5:30

भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने औंढा (ना.) येथे लायगो प्रकल्प उभारण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

There are many opportunities available for the Lego project | लायगो प्रकल्पामुळे अनेक संधी होणार उपलब्ध

लायगो प्रकल्पामुळे अनेक संधी होणार उपलब्ध

googlenewsNext
ठळक मुद्देपद्मविभूषण अनिल काकोडकर औंढा येथे भारत-अमेरिकेच्या विद्यमाने लायगो प्रकल्प

नांदेड : भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने औंढा (ना.) येथे लायगो प्रकल्प उभारण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान हे अतिप्रगत आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थी आणि संशोधकांना नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे माजी अध्यक्ष तथा राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी मंगळवारी त्यांनी विद्यापीठास विशेष भेट दिली. यादरम्यान त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या समवेत विद्यापीठ परिसरातील विज्ञानांतर्गत येणाऱ्या भूशास्त्र संकुल, रसायनशास्त्र, जैवतंत्रशास्त्र आणि भौतिकशास्त्र संकुलास भेट दिली. तेथील प्रयोगशाळेमधील विविध यंत्रांची पाहणी करून विद्यापीठाच्या प्रगतीचे कौतुक केले. यानंतर विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि संशोधक विद्यार्थी यांच्यासमवेत त्यांनी संवाद साधला.
याप्रसंगी मंचावर कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ.वैजयंता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.काकोडकर म्हणाले, विद्यापीठाने शैक्षणिक दर्जा वाढविण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांची सर्वार्थाने प्रगती होण्यासाठी नियमांच्या चौकटीत राहून विकास साधावा. संलग्नित महाविद्यालयांना स्वायत्ता मिळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असावे. स्वतंत्र विद्यापीठ उभारण्यासाठी मदत करावी.
चर्चासत्रादरम्यान व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. वैजयंता पाटील, डॉ.गजानन झोरे, डॉ. निशिकांत धांडे, डॉ.राजाराम माने, डॉ. तेहरा यांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यापीठातील नवोक्रम केंद्राला राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अनुदान देण्याची विनंती मान्य केली.
तसेच जेनेटीक मॉडिफिकेशन (गुणसूत्रीय बदल) तंत्रज्ञानाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी संशोधकांनी पुढाकार घ्यावा व संशोधन विकसित करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या २५ वर्षांतील विकासात्मक आराखडा सादर केला.
सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. अरविंद सरोदे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते़

Web Title: There are many opportunities available for the Lego project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.