तेलंगणा समावेशाचे लोण आता किनवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:39 AM2018-06-24T00:39:38+5:302018-06-24T00:40:37+5:30

धर्माबाद तालुक्यातील ३२ गावांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यानंतर खळबळ उडाली होती़ त्यानंतर हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यांतीलही काही गावांनी अशीच मागणी केली होती़ त्यात आता हे लोण किनवट तालुक्यातही पोहोचले आहे़ किनवटच्या अप्पारावपेठच्या ग्रामस्थांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे़ त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे़

Telangana's inclusion bill is now ready | तेलंगणा समावेशाचे लोण आता किनवटला

तेलंगणा समावेशाचे लोण आता किनवटला

googlenewsNext
ठळक मुद्देअप्पारावपेठच्या ग्रामस्थांचीही मागणी, अर्धा कि.मी. अंतरावर तेलंगणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : धर्माबाद तालुक्यातील ३२ गावांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यानंतर खळबळ उडाली होती़ त्यानंतर हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यांतीलही काही गावांनी अशीच मागणी केली होती़ त्यात आता हे लोण किनवट तालुक्यातही पोहोचले आहे़ किनवटच्या अप्पारावपेठच्या ग्रामस्थांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे़ त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे़
धर्माबाद तालुक्याने तेलंगणा समावेशाची मागणी केल्यानंतर प्रशासन आणि राज्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मागणीची दखल घेत सरपंच संघटनेला चर्चेसाठी ‘मातोश्री’वर बोलावले होते़
त्यानंतर पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात धर्माबादच्या मागण्यांवर बैठक घेण्यात आली़ त्यानंतर धर्माबादसाठी ४० कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले़ त्यात बिलोली आणि हिमायतनगर तालुक्यांतील अनेक गावांनी तशाच प्रकारची मागणी केली़ त्यामध्ये आता किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ या गावाची भर पडली आहे़ अप्पारावपेठ ग्रामपंचायतने जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून गावाचा तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे़
अप्पारावपेठ हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर आहे़ महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी हे गाव तेलंगणातील बोथ तालुक्यात होते़ अप्पारावपेठ येथील बहुतांश नागरिक तेलगू भाषिक आहेत़ ग्रामस्थांचे व्यवहारही तेलंगणाशी आहेत़ किनवटपासून ७५ किमी अंतरावर असल्यामुळे फक्त शासकीय कामासाठीच ग्रामस्थांना किनवटला यावे लागते़ तर जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी सव्वाशे किमीचे अंतर पार करावे लागते़ गावात कुठल्याच सोयीसुविधा नाहीत़ अधिकारीही फिरकत नाहीत़
पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या या गावापासून अर्धा किलोमीटरवर तेलंगणा आहे़ त्यामुळे अप्पारावपेठचा तेलंगणात समावेश केल्यास या गावचा विकास होईल असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ याबाबत सरपंच सुनीता लोकावार, तंटामुक्तीचे अध्यक्ष विनायक देशमुख, जि़प़सदस्य सूर्यकांत आरडकर, अ‍ॅड़एक़ामारेड्डी, भोजारेड्डी नुतूल, भुमेश किनी, प्रभाकररेड्डी, फारुख शेख, शेख अजीम यांच्यासह जवळपास दोनशे नागरिकांच्या स्वाक्षºयांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे़

Web Title: Telangana's inclusion bill is now ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.