आगामी काळात साखरेचे दर वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:19 AM2018-11-27T00:19:13+5:302018-11-27T00:20:31+5:30

पुढील वर्षी आपल्याच देशाला साखरेची आयात करावी लागण्याची शक्यता आहे़ त्यामुळे साखरेचे भाव वाढणार आहेत़

Sugar prices will rise in the coming period | आगामी काळात साखरेचे दर वाढणार

आगामी काळात साखरेचे दर वाढणार

Next
ठळक मुद्देऊस परिषद : स्वाभिमानीचे खा़ राजू शेट्टी यांची माहिती

नांदेड : यंदा जगभरात साखरेचे उत्पादन कमी झाले आहे़ पुढील वर्षी आपल्याच देशाला साखरेची आयात करावी लागण्याची शक्यता आहे़ त्यामुळे साखरेचे भाव वाढणार आहेत़ त्यामुळे साखर कारखान्यांना एफआरपी वाढवून देणे परवडणारे आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा़ राजू शेट्टी यांनी केले़
नांदेडात आयोजित पहिल्या ऊस परिषदेत ते बोलत होते़ खा़शेट्टी म्हणाले, केवळ भाषणे करुन न्याय मिळणार नाही़ तो तसा मिळाला असता तर नाना पाटेकर क्रांतिवीर झाले असते़ भाषणाला चळवळीची जोड देणे आवश्यक आहे़ शेतकऱ्यांची पोरे ज्यावेळी ज्ञानेश्वर होतील त्यावेळी कारखानदारांचे रेडे वेद म्हणतील़ एकरकमी एफआरपी देता येणे शक्य नसल्याची कारखानदारांची ओरड आहे़ परंतु, ऊस दर नियंत्रण अध्यादेशाप्रमाणे तोडणीनंतर १४ दिवसांच्या आत शेतकºयाच्या खात्यावर एकरकमी रक्कम जमा झाली पाहिजे़ अन्यथा जप्तीची कारवाई होवू शकते़ कायदाही शेतकºयांच्याच बाजूने आहे़ कर्जमाफी केली ; पण निकषांनी घात केला़ शेतकºयांच्या हमीभावासंदर्भात मसुदा तयार केला असून २१ पक्षांनी या मसुद्याला पाठिंबा दिल्याचेही खा़शेट्टी म्हणाले़ तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारवर सडकून टीका केली़ ते म्हणाले, शरद जोशींच्या काळात चळवळीचे केंद्र नांदेड होते़ शेतकºयाची मुले ही वाघाची बछडे आहेत़ त्यांनी डरकाळी मारली तर महाराष्ट्र हादरेल़ बोंडअळीने शेतकºयांचे नुकसान केले़ यावर्षी पुन्हा ती आली़ यामागे मंत्री अन् कंपन्यांचे साटेलोटे आहे़ कंपन्याकडून मंत्री कमिशन घेतात़ आरक्षणावरुनही मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा उद्योग सुरु आहे, असेही ते म्हणाले़ प्रास्ताविक प्रा़डॉ़प्रकाश पोपळे यांनी केले़ तर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी एफआरपीचे थकीत दहा कोटी मिळविण्यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाचा आढावा घेतला़ जिल्ह्यात स्वाभिमानीचे जाळे निर्माण करताना आलेल्या अडचणीही त्यांनी मांडल्या़ परिषदेच्या अध्यक्षस्थानी माणिकराव राजेगोरे तर प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री सुबोध मोहिते, हनुमंत राजेगोरे, माणिक कदम, देवेंद्र भुयार, भगवानराव शिंदे, किशोर ढगे, अमित आघाव यांची उपस्थिती होती़
सेनेच्या अयोध्या दौ-याला भाजपची फूस
महाराष्ट्रात दुष्काळ असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख अयोध्या दौ-यावर गेले़ त्यांच्या अयोध्या दौ-याला भाजपाची फूस आहे़ कारण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगवान श्रीराम उद्धव ठाकरे यांना आशीर्वाद देतील असे म्हटले आहे़ तसेच आमची युती आणखी पक्की होईल असेही भाजपाचे नेते सांगत सुटले आहेत़ त्यामुळे सेनेला पुढे जावून ओपनिंग तेवढी तुम्ही करा बाकी बॅटींग आम्ही करतो, असे भाजपाचे धोरण आहे़ श्रीरामाबद्दल आम्हालाही आस्था आहे़ परंतु एवढे वर्षे मंदिर झाले नाही़ तर कुठे फरक पडला काय? पहिले शेतकºयांच्या घामाचे पैसे द्या अन् नंतर मंदिर बांधा असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले़

Web Title: Sugar prices will rise in the coming period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.