नांदेड शहर स्वच्छतेसाठी जुळवाजुळव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:20 AM2018-02-19T00:20:44+5:302018-02-19T00:20:59+5:30

शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्च २०१७ पासून ऐरणीवर आला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर हा विषय मार्गी लागला आहे. शिवजयंतीनंतर प्रत्यक्ष शहरात खाजगी कंत्राटदाराकडून स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागातून देण्यात आली.

Start the Nanded town for cleanliness | नांदेड शहर स्वच्छतेसाठी जुळवाजुळव सुरू

नांदेड शहर स्वच्छतेसाठी जुळवाजुळव सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देन्यायालयाच्या निर्णयानंतर कामाला होणार प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्च २०१७ पासून ऐरणीवर आला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर हा विषय मार्गी लागला आहे. शिवजयंतीनंतर प्रत्यक्ष शहरात खाजगी कंत्राटदाराकडून स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागातून देण्यात आली.
शहर स्वच्छता निविदाप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात एकदा नव्हे, तर दोनदा याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबईच्या आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदाराची निविदा सर्वात कमी दराची होती. त्याखालोखाल बंगळूरच्या पी. गोपीनाथ रेड्डी यांचे दर होते. मात्र दुसqया क्रमांकाचे दर असलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी यांनी १२ डिसेंबर २०१७ आणि २९ जानेवारी २०१८ अशा दोन वेळा औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेचा अंतिम निकाल १४ फेब्रुवारी रोजी लागला. त्यामध्ये महापालिकेच्या निविदा प्रक्रियेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. महापालिकेची प्रक्रिया योग्य ठरविली. परिणामी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी १५ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदारास शहर स्वच्छतेच्या कामास प्रारंभ करण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार सदर कंत्राटदाराकडून साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे. शिवजयंतीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.
कचºयाचे संकलन करणे, रहिवासी, निवास, हॉटेल, आठवडी बाजार, कत्तलखाना आदी ठिकाणाहून घनकचरा, रिक्षा, आॅटो, टिप्पर, ट्रॅक्टरने संकलित करणे तसेच दैनंदिन रस्ते सफाई व नालेसफाईसाठी कामगार पुरवणे ही मुख्य जबाबदारी सदर कंत्राटदाराची आहे. त्याचवेळी घनकचºयासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. रस्ते सफाईतून जमा झालेला कचरा उचलून नेणे, शहर कचरामुक्त करणे, कचरा उचलणाºया सर्व गाड्यांना जीपीए सिस्टीम बसविणे व ते मनपा कार्यालयातील नियंत्रण कक्षात जोडणे, ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यासाठी सुविधा द्यावी लागणार आहे.
शहरातील दैनंदिन कचरा उचलण्यासाठी व डंपिंग ग्राऊंडला टाकण्यासाठी सदर कंत्राटदारास जवळपास १७० वाहने नव्याने खरेदी करण्याचे आदेशही महापालिकेने दिले आहेत. प्रारंभी तीन महिने जुन्या वाहनांतून कचरा उचलण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यानंतर मात्र टाटा एस-९०, टाटा-४०७ टेंपो-२०, रिफ्यूज कॉम्पॅक्टर-६, जेसीबी-१, डंबर प्लेसर-२ आणि एक ट्रॅक्टर असे जवळपास १७० वाहने नव्याने खरेदी करावी लागणार आहे.
या वाहनांवर ३५३ मजूरही ठेकेदाराला उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. शहरातून उचलणारा प्रतिटन कचरा हा १६३१ रुपये दराने उचलला जाणार आहे.

Web Title: Start the Nanded town for cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.