एसटी प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या संपाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 05:59 PM2018-07-19T17:59:17+5:302018-07-19T18:00:17+5:30

परिवहन मंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ ऐन आषाढी एकादशी यात्रेदरम्यान एसटी कर्मचारी संपावर जातील, अशी धास्ती एसटी प्रशासनाने घेतली आहे.

ST administration fears of employees' strike | एसटी प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या संपाची धास्ती

एसटी प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या संपाची धास्ती

Next
ठळक मुद्देवेतनवाढ समाधानकारक न झाल्याने एसटी कर्मचारी संप पुकारतील, असा अंदाज एसटी प्रशासनाने लावला आहे़

नांदेड : परिवहन मंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ ऐन आषाढी एकादशी यात्रेदरम्यान एसटी कर्मचारी संपावर जातील, अशी धास्ती एसटी प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी पत्र काढून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत़ 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा संघर्ष अजूनही कायम असून योग्य वेतनवाढ मिळण्याची खदखद कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे़ त्यामुळे आषाढी एकादशी यात्रेदरम्यान पुन्हा एकदा संप पुकारून एसटी प्रशासन आणि परिवहनमंत्र्यांना धक्का देण्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे़ काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वयंघोषित संप पुकारून प्रशासनासह प्रवाशांना वेठीस धरले होते़ 
एसटी प्रशासन आणि एसटी कर्मचारी संघटनांमध्ये वाटाघाटी होवून संप मागे घेण्यात आला होता़

परंतु, परिवहनमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना कंत्राटी म्हणून काम करण्याचा दिलेला सल्ला आणि वेतनवाढ समाधानकारक न झाल्याने एसटी कर्मचारी संप पुकारतील, असा अंदाज एसटी प्रशासनाने लावला आहे़ त्यानुसार एसटी प्रवाशांना, विशेषत: पंढरपूर यात्रेतील भाविक वारकऱ्यांना कुठलाही त्रास होवू नये म्हणून वेळीच खबरदारी म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश विभाग नियंत्रकांना दिले आहेत़ यात्रा कालावधीत कोणी कर्मचाऱ्यांनी संपात भाग घेतला तर त्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, वेळप्रसंगी गृहरक्षक, पोलीस विभागाची मदत घेण्याचे पत्रात म्हटले आहे़  

इंटक वारकऱ्यांच्या सेवेत
आषाढी एकादशी यात्रेत ग्रामीण भागातील वारकरी सहभागी असतात़ त्यामुळे या कालावधीत संपावर जाण्याचा अथवा संप पुकारण्याचा प्रश्नच येत नाही़ कोणी कर्मचारी अथवा एखाद्या संघटनेने संप पुकारला तर त्यास आमचा पाठिंबा राहणार नाही़ उलट यात्रा कालावधीत वारकºयांची सेवा देण्यासाठी वेळप्रसंगी आम्ही २४ तास एसटीच्या कर्तव्यावर राहू़ परंतु, वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल़ 
- पी़ आऱ इंगळे (विभागीय अध्यक्ष,महाराष्ट्र एसटी वर्कर्स इंटक, नांदेड़)

 

Web Title: ST administration fears of employees' strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.