नांदेड येथे योग दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:52 AM2018-06-22T00:52:17+5:302018-06-22T00:52:17+5:30

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही गुरुवारी ही अनुभूती घेतली. योगासाठी शाळा-महाविद्यालयाच्या मैदानासह इतरत्र पहाटेपासूनच गर्दी दिसत होती.

Spontaneous response to Yoga Day at Nanded | नांदेड येथे योग दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड येथे योग दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : एखाद्या शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाणी जावे असे प्रत्येकास वाटते. मात्र स्पर्धेच्या युगात ते शक्य होत नाही. परंतु आपल्याला हवी असलेली शांती आपल्यामध्येच वसलेली आहे. हे फार थोड्या लोकांना कळते. फक्त या शांतीची अनुभूती घेण्यासाठी थोडा वेळ काढावा लागतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही गुरुवारी ही अनुभूती घेतली. योगासाठी शाळा-महाविद्यालयाच्या मैदानासह इतरत्र पहाटेपासूनच गर्दी दिसत होती.
जिल्हा प्रशासन व आंतरराष्ट्रीय योग दिन समिती नांदेड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नेहरु युवा केंद्र, जिल्हा स्काऊट गाईड व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन श्री गुरुग्रंथ साहिब भवन, गुरुद्वारा परिसर नांदेड येथे करण्यात आले. या कार्यक्रमास शहरातील अंदाजे पाचशे खेळाडू मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक, महिला, विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पतंजलीचे योग प्रशिक्षण आनंददेवजी महाराज, हरिद्वार मुळ प्रयाग अलाहाबाद यांचे स्वागत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी तर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, अशोक देवकरे, नांदेड गुरुद्वारा बोर्डाचे डी.पी. सिंघ, गुरुविंदरसिंघ वाधवा, शिवाजी शिंदे, पतंजली योग समितीचे साजणे, पी.डी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात स्वामी आनंददेवजी महाराज यांनी उपस्थितांना योगासन, प्राणायाम, ध्यानचे प्रात्यक्षिक करुन दाखविले व उपस्थितांकडून करुन घेतले. सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले तर आभार दिगंबर करंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय चव्हाण, आनंद जोंधळे, मोहन पवार, धम्मानंद कांबळे, विद्यानंद भालेराव आदींनी परिश्रम घेतले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही योग दिवस उत्साहात साजरा झाला. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातही पहाटेपासूनच योगासाठी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गर्दी केली होती. याबरोबरच विविध शासकीय कार्यालयांचा परिसरही योग दिवसानिमित्ताने पहाटेपासूनच गजबजलेला होता.
----
कुलगुरू : योगसाधना उन्नत बनविते
मनच शरीराला कार्य करायला लावते. मनावर आपला ताबा नसेल तर समाजामध्ये स्वास्थ असणार नाही. म्हणून आज योगाची मोठी गरज आहे. योग साधना मानवी जीवनाला उन्नत बनविते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले. विद्यापीठात योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सौ. संध्या विद्यासागर, प्र. कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी आदींची उपस्थिती होती. यावेळी संध्या विद्यासागर यांनी ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ या ग्रंथातील योग दिन सादर केले. शिबिरासाठी योगाचार्य रामचंद्र गरड व शिवमूर्ती भातांब्रे यांना निमंत्रित करण्यात आले होते. सुत्रसंचलन डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांनी केले.

Web Title: Spontaneous response to Yoga Day at Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.