चंदनाची नांदेडमार्गे तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:25 AM2019-01-23T00:25:48+5:302019-01-23T00:27:35+5:30

वसमत तालुक्यातील पांगरा येथून महिंद्र पीकअप वाहनाच्या खालच्या बाजूने कप्पा करुन त्यातून होणारी चंदनाची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने रोखली़

Smuggling of sandalwood through Nanded | चंदनाची नांदेडमार्गे तस्करी

चंदनाची नांदेडमार्गे तस्करी

googlenewsNext
ठळक मुद्देस्थागुशाची कामगिरी ४६० किलो चंदन केले जप्त

नांदेड : वसमत तालुक्यातील पांगरा येथून महिंद्र पीकअप वाहनाच्या खालच्या बाजूने कप्पा करुन त्यातून होणारी चंदनाची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने रोखली़ चंदासिंग कॉर्नरपासून सिनेस्टाईल या वाहनाचा पाठलाग करीत पोलिसांनी ९ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४६० किलो चंदन जप्त केले आहे़ या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली़
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा येथून चंदनाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती़ त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके नियुक्त करण्यात आले होते़ यातील एक पथक भोकर फाटा आणि दुसरे चंदासिंग कॉर्नर येथे थांबले होते़ पांगरा येथून निघालेला महिंद्र पीक अप (क्र.के़ए़-१८,८५०१) हा मालेगावमार्गे नांदेड शहरात आला़ त्यानंतर नांदेड शहरातून तो चंदासिंग कॉर्नरमार्गे हैद्राबादकडे जात असल्याची कुणकुण स्थागुशाच्या पथकाला लागली़
मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पथकाने मारतळ्यापर्यंत या वाहनाचा पाठलाग करुन त्यांना पकडले़ पोलिसांनी पीकअप वाहनाची तपासणी केली असता, खालच्या बाजूने कप्पा करुन त्यामध्ये चंदन असल्याचे आढळून आले़ पोलिसांनी वाहनातील ४६० किलो चंदन जप्त केले़ तर कुरुंदा येथील शेख अली शेख खॉजा व चालक मोहम्मद खुनी मोहम्मद सोफी या दोघांना अटक केली आहे़ या प्रकरणात एकूण तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
हे आरोपी आंतरराज्यीय असून इतर आरोपींच्या शोधासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे़
पोनि़सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोउपनि कल्याण नेहरकर, शहादेव खेडकर, दशरथ जांभळीकर, सुनील गटलेवार, पोतदार, गजानन बयनवाड, मंगेश जोंधळे, शैलेश बुडगुलवाड, बजरंग बोडके, व्यंकट गंगुलवार, श्रीरामे यांनी ही कारवाई केली़

  • वसमतहून निघालेली महिंद्रा पीकअप प्रथमदर्शनी रिकामीच दिसत होती़ परंतु, या वाहनाच्या खालच्या बाजूने चंदन तस्करीसाठी कप्पा करण्यात आला होता़ या कप्प्यात तब्बल ४६० किलो चंदन घेवून जात होते़ पोलिसांनी वाहनाला अडविल्यानंतर सुरुवातीला ते रिकामेच दिसले़ कसून तपासणी केल्यानंतर लपविलेले चंदन पोलिसांच्या हाती लागले़

Web Title: Smuggling of sandalwood through Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.