नांदेडात ४१ जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:21 AM2019-04-11T00:21:52+5:302019-04-11T00:22:19+5:30

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय यांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची चिंता असते़ या काळजीतच अनेकदा ते टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येसारखा निर्णय घेतात़

Shubhamangal of 41 couples in Nanded | नांदेडात ४१ जोडप्यांचे शुभमंगल

नांदेडात ४१ जोडप्यांचे शुभमंगल

Next
ठळक मुद्देस्वयंसेवकांच्या परिश्रमाने दिमाखदार सोहळा

नांदेड : ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय यांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची चिंता असते़ या काळजीतच अनेकदा ते टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येसारखा निर्णय घेतात़ अशा कुटुंबाच्या मदतीला साईप्रसाद ही स्वयंसेवकांची संघटना धावून जाते़ बुधवारी साईप्रसादच्या वतीने आयोजित विवाह सोहळ्यात अशाच कुटुंबातील ४१ जोडप्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यात आल्या़ स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमामुळे संकटात सापडलेल्या या जोडप्यांच्या नवआयुष्याला सुरुवात झाली आहे़
सनई, चौघड्याचा मंजुळ स्वर, १ लाख चौरस फुटांचा भव्य मंडप, ५०० फूट लांबीचे व्यासपीठ या सोहळ्यासाठी उभारण्यात आले होते़ कोणताही पदाधिकारी किंवा अध्यक्ष व्यासपीठावर न जाता संतांच्या आशीर्वादात दिमाखदार सोहळा पार पडला़ आतापर्यंत साईप्रसादच्या वतीने अशा सोहळ्याच्या माध्यमातून २२९ विवाह लावून दिले आहेत़ यंदाच्या सोहळ्यातील ४१ जोडप्यांपैकी ८ वधू-वरांचे वडील हयात नाहीत़ ३ जोडप्यांच्या डोक्यावरुन आई अन् वडील दोघांचेही छत्र हरवले आहे़ अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील जोडपेही आजच्या सोहळ्यात लग्नबंधनात अडकले़ सकाळी साडेसहा वाजेपासूनच वधू-वरांच्या आगमनाला सुरुवात झाली होती़ प्रत्यक वºहाडाला स्वतंत्र खोली देण्यात आली होती़
सोहळ्यामध्ये वधू पक्षाची बाजू सांभाळत साईप्रसादच्या स्वयंसेवकांनी आपली भूमिका चोख बजावली़ सकाळी चहा-नाश्ता व त्यानंतर जेवण अशी व्यवस्था करण्यात आली होती़ दुपारी सव्वा दोन वाजता मंगलमय वातावरणात या जोडप्यांवर फुलांचा अक्षदा टाकण्यात आला़ सोहळ्यात जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी संत बाबा कुलवंतसिंघजी, संत श्री नरेंद्रसिंघजी महाराज, संत बाबा बलविंदरसिंघजी, संत बाबा प्रेमसिंघजी, संत बाबा ज्योतिंदरसिंघजी यांची उपस्थिती होती़ जवळपास पंधरा हजार वºहाडींची या लग्नसोहळ्याला उपस्थिती होती़ परंतु, कुठेही रुसवा-फुगवा नाही़ स्वयंसेवकांनीही आपल्याच घरातील लग्नकार्य आहे, या भावनेतून हातभार लावला़
अंगणात जावून लावणार लग्न
वसमत तालुक्यातील हट्टा येथे नानासाहेब भवर यांच्या मुलीचे ७ मे २०१९ रोजी लग्न ठरले होते़ परंतु पैशाची व्यवस्था होत नसल्यामुळे २८ मार्च रोजी नानासाहेब यांनी आत्महत्या केली़ भवर कुुटुंबाला २० गुंठे जमीन असून ते मजुरी करतात़ त्यांच्या मदतीसाठी साईप्रसादने त्यांच्या मुलीचा त्यांच्या अंगणात जावून लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे़ या जोडप्याला संसारोपयोगी सर्व वस्तू देण्यात येणार आहेत़

Web Title: Shubhamangal of 41 couples in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.