मतदार नोंदणीसाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:42 AM2018-09-19T00:42:52+5:302018-09-19T00:44:04+5:30

येणारी लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीची तयारी प्रमुख पक्षांकडून सुरु झाली आहे. भाजपा, काँग्रेसकडून सदस्य नोंदणीसह मतदार नोंदणीचा आढावा घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात आहे. काँग्रेसच्या ‘शक्ती अ‍ॅप’ द्वारे सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार जणांनी यावर नोंदणी केली आहे. दुसरीकडे भाजपाकडून मिस्डकॉलद्वारे सदस्य नोंदणी मोहीम सुरु आहे.

Rope for voter registration | मतदार नोंदणीसाठी रस्सीखेच

मतदार नोंदणीसाठी रस्सीखेच

Next
ठळक मुद्देबुथवाईज जबाबदारी : काँग्रेस, भाजपाकडून आॅनलाईन आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : येणारी लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीची तयारी प्रमुख पक्षांकडून सुरु झाली आहे. भाजपा, काँग्रेसकडून सदस्य नोंदणीसह मतदार नोंदणीचा आढावा घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात आहे. काँग्रेसच्या ‘शक्ती अ‍ॅप’ द्वारे सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार जणांनी यावर नोंदणी केली आहे. दुसरीकडे भाजपाकडून मिस्डकॉलद्वारे सदस्य नोंदणी मोहीम सुरु आहे.
येणाऱ्या निवडणुकांची सर्वच पक्षांकडून तयारी सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने निवडणुकांच्या अनुषंगाने पात्र मतदारांच्या नोंदणीचा कार्यक्रम सध्या जिल्हाभरात राबविला जात आहे. १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारित हा कार्यक्रम आहे. मतदारयादी नावनोंदणी व दुरुस्तीसाठी ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत संबंधित मतदान केंद्रावर बीएलओमार्फत विहित नमुन्यात फॉर्म भरुन द्यायचा आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांची सध्या मतदार नोंदणी सुरु आहे. येणाºया निवडणुकांसाठी याच मतदारयादीचा उपयोग केला जाणार असल्याने यंदा प्रशासनाबरोबरच प्रमुख पक्षांनीही मतदारयादी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम चांगलाच मनावर घेतल्याचे दिसते.
काँग्रेसने जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे. नोंदणीसाठी बुथवाईज कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका बुथमधील मतदान नोंदणीसाठी काँग्रेसचे दहा कार्यकर्ते पाठपुरावा करीत आहेत. या कार्यकर्त्यांकडून झालेल्या नोंदणीचा आढावा घेण्यासाठी पक्षाने कार्यकर्त्यांची दुसरी फळी उभारली आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची, विद्यार्थ्यांची नोंदणी करुन घेण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे. दुसरीकडे भाजपानेही मतदार नोंदणीसाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लावल्याचे दिसून येते. एका बुथमध्ये किमान ५० नवमतदारांची नोंदणी झाली पाहिजे, असे पक्षश्रेष्ठींचे निर्देश आहेत.
त्यामुळे बुथवाईज कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मतदार नोंदणीचा पक्षाच्या मुंबईमधील वॉररुममधून दररोज आढावा घेतला जात आहे. नोंदणी केलेल्या नवमतदारांची नावे पक्षाला मेलद्वारे पाठविण्यात येत आहेत.

निवडणूक तयारीत शिवसेना पिछाडीवरच
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस, भाजपा हे प्रमुख पक्ष लागले आहेत़ शिवसेना मात्र पक्षातंर्गत बाबीतच अडकली आहे़ महापालिका निवडणुकीत दारुण पराभवातून शिवसेना अद्याप सावरलीच नाही़ जिल्ह्याचे पालकमंत्री पद रामदास कदम यांच्याकडे आल्यानंतर सेनेची फेरउभारणी होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र तीही आजघडीला तरी फोल ठरली आहे़ महापालिका निवडणुकीपासून नांदेडचे उत्तर जिल्हा प्रमुखपद अद्यापही रिक्तच आहे़ इतर पदेही भरण्यात आले नाही़ परिणामी सेनेवरील मरगळ कायम आहे़ त्यामुळे निवडणूक तयारीत सेना पिछाडीवरच आहे़

प्रशासनाचीही तयारी
लोकसभा निवडणुकीचे वारे राजकीयस्तरावर वाहत आहे. त्याचवेळी प्रशासकीय स्तरावरही या निवडणुकीची तयारी केली जात आहे. मतदारयादी अंतिम करण्यासह मतदान प्रक्रियेसाठी लागणाºया ईव्हीएम मशीन, जनजागृती आदींचीही तयारी सुरु आहे.

काँँग्रेसच्या सदस्य नोंदणीला प्रतिसाद
मतदार नोंदणीबरोबरच पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठीही प्रमुख पक्षांकडून यंत्रणा कार्यरत आहे. काँग्रेसतर्फे ‘शक्ती अ‍ॅप’ विकसित करण्यात आले असून या अ‍ॅपवर काँग्रेस सदस्यांची आॅनलाईन नोंदणी केली जात आहे. सदस्य नोंदणीत नांदेड जिल्हा आघाडीवर असून सुमारे ३५ हजार जणांनी या अ‍ॅपच्या माध्यमातून काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यात उत्तर नांदेडमधून ८ हजार ५००, दक्षिण नांदेडमधून ६ हजार ७००, भोकर आणि मुखेड विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ७ हजार तर नायगाव मतदारसंघातून अडीच हजार नागरिकांनी या अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणी केली आहे.

Web Title: Rope for voter registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.