दरोड्याच्या तयारीतील आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:12 AM2019-04-29T00:12:00+5:302019-04-29T00:14:34+5:30

शहरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी लूटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ त्यामुळे पोलिसांनी शहरात गस्त वाढविली आहे़ विमानतळ व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाचप्रकारे दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या आठ आरोपींना पोलिसांनी पकडले आहे़

robber arrested who going to robbery | दरोड्याच्या तयारीतील आरोपी अटकेत

दरोड्याच्या तयारीतील आरोपी अटकेत

Next
ठळक मुद्देआठ जणांना पकडले : अंधाराचा फायदा घेत दोघे पळालेआरोपींकडून धारदार शस्त्रे जप्त

नांदेड : शहरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी लूटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ त्यामुळे पोलिसांनी शहरात गस्त वाढविली आहे़ विमानतळ व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाचप्रकारे दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या आठ आरोपींना पोलिसांनी पकडले आहे़ त्यांच्याकडून धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत़ तर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेवून पसार झाले़
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत महेबूबनगर नवीन बायपास ते देगलूर नाका रस्त्यावर तोंडाला रुमाल बांधून काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि विनायक शेळके यांना मिळाली होती़ शेळके यांनी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास या परिसरात सापळा रचला़ यावेळी अचानक आरोपींवर धाड मारुन त्यांना पकडण्यात आले़
शेख सलीम शेख अब्दूल रज्जाक राफ़ारुख नगर, संतोष ऊर्फ चिंग्या साईनाथ तरटे राख़ोब्रागडे नगर, योगेश ऊर्फ पप्या प्रदीप गजभारे राख़ोब्रागडेनगर या तिघांना पोलिसांनी पकडले़ तर साईनाथ माधवराव गजलवाड रा़सखोजीनगर व सय्यद जाकीर रा़महेबुबनगर हे दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले़ पोलिसांनी या आरोपीकडून दरोडा टाकण्याच्या साहित्यासह दोन खंजीर, एक लोखंडी हातोडा जप्त केला़ या प्रकरणी पोउपनि विनायक शेळके यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
तर दुसरी घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली़ लालवाडी अंडरब्रीज जवळ काही जण दबा धरुन बसले होते़ शिवाजीनगरचे सपोनि करिम खॉन सत्तार खॉन पठाण यांनी फौजफाट्यासह त्या ठिकाणी धाड मारली़
यावेळी आरोपीजवळ शस्त्र, काठ्या, लोखंडी सळई, दोरी हे दरोडा टाकण्याचे साहित्य आढळून आले़
पोलिसांनी या ठिकाणाहून शेख इस्माईल शेख गुलाम हुसेन रा़ दुलशहा रहिमानगड, धोंडिबा बालाजी सूर्यवंशी रा़ राजेशनगर तरोडा नाका, राष्ट्रपाल ऊर्फ छटाक्या दिलीप जावळे रा़ आंबेडकरनगर, शेख मोबशिर शेख आमेर रा़ नवी आबादी, आकाश ऊर्फ बाळ्या सखाराम कांबळे रा़ जयभीमनगर या पाच जणांना अटक केली़ त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के यांनी भेट दिली़
युवकाला लुबाडणारा पोलिसांच्या जाळ्यात
लातूर फाटा परिसरात एका तरुणाला तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडील ५६ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपीच्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या आहेत़
९ एप्रिल रोजी रात्री लातूर फाटा परिसरातून जाणा-या दिगांबर रामराव लोंडे यांना अजय भगवान माने याने अडविले होते़ यावेळी माने याने लोंडे यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख सहा हजार रुपये आणि सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ५६ हजारांचा ऐवज पळविला होता़
आरोपी माने याला गुन्हे शोध पथकाचे पोउपनि शेख जावेद, पोहेकॉ़मोकले, पोना़मलदोडे, केंद्रे, पोकॉ़नागरगोजे, गुंडेकर यांच्या पथकाने वसरणी भागातून ताब्यात घेतले़ या आरोपीकडून परिसरात घडलेले आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़
लुटीच्या अनेक घटना
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडको, लातूर फाटा, कौठा, साई कमान आदी परिसरात गेल्या काही दिवसांत सातत्याने लुटीच्या घटना घडत आहेत़ दुचाकीवरुन जाणाऱ्यांना अडवून खंजीरचा धाक दाखवित त्यांच्याकडील ऐवज पळविला जात आहे़ सातत्याने घडणा-या या घटनामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरुन जाणा-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे़

Web Title: robber arrested who going to robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.