नांदेड लोकसभेसाठी २ हजार २८ मतदान केंद्रावर होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 07:19 PM2019-04-17T19:19:36+5:302019-04-17T19:25:42+5:30

जिल्‍ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आरोग्‍य विषयक सुविधाही पुरविण्‍यात आली आहेत.

Polling for Nanded Lok Sabha polls will be done on 2 thousand and 28 centre | नांदेड लोकसभेसाठी २ हजार २८ मतदान केंद्रावर होणार मतदान

नांदेड लोकसभेसाठी २ हजार २८ मतदान केंद्रावर होणार मतदान

Next
ठळक मुद्दे११ हजार १५५ अधिकारी,कर्मचारी नियुक्‍त१७ लाख १७ हजार ८२५ म‍तदार बजावणार मतदानाचा हक्‍क 

नांदेड : १६- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज २ हजार २८ मतदान केंद्रावरुन सकाळी ७-०० वाजल्‍यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने संपूर्ण तयारी करण्‍यात आली असून याकामी ११ हजार १५५ अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. तर जिल्‍ह्यात १७ लाख १७ हजार ८२५ म‍तदार मतदानाचा हक्‍क बजावणार असल्याचे जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.

मतदार संघातील मतदान केंद्र  
      नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २ हजार २८ मतदान केंद्र स्‍थापन करण्‍यात आली आहेत. यामध्‍ये ८५- भोकर मतदान केंद्र संख्‍या - ३२९, ८६-नांदेड उत्‍तर - मतदान केंद्र संख्‍या ३४६,८७- नांदेड दक्षिण मतदान केंद्र संख्‍या -३२४,  ८९- नायगांव खै. मतदान केंद्र संख्‍या -३४२, ९०- देगलूर मतदान केंद्र संख्‍या -३४६, ९१-मुखेड मतदान केंद्र संख्‍या -३४१ असे एकूण नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २ हजार २८ मतदान केंद्र स्‍थापन करण्‍यात आली आहेत.  

नांदेड लोकसभा मतदारसंघात 17 लाख 17 हजार 825 मतदार
    16 - नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 17 हजार 825 मतदार आहेत. यात पुरुष मतदार 8 लाख 91 हजार 89, महिला मतदार 8 लाख 26 हजार 673 इतर 63 मतदारांचा समावेश आहे.  
यामध्‍ये 85- भोकर विधानसभा मतदारसंघात पुरुष 1 लाख 43 हजार 65, महिला मतदार 1 लाख 33 हजार 844 तर इतर 5 असे  एकूण 2 लाख 76 हजार 914 मतदार आहेत. 86- नांदेड उत्‍तरमध्‍ये 3 लाख 80 हजार 97 मतदार आहेत. यात पुरुष 1 लाख 59 हजार 767, महिला मतदार 1 लाख 48 हजार 282 तर इतर 48 मतदाराचा समावेश आहे. 87- नांदेड दक्षिण मतदारसंघात पुरुष 1 लाख 45 हजार 615, महिला मतदार 1 लाख 35 हजार 617 असे एकूण 2 लाख 81 हजार 232 मतदाराचा समावेश आहे. 89- नायगावमध्‍ये एकूण 2 लाख 82 हजार 898 मतदार आहेत. यात पुरुष 1 लाख 46 हजार 626, महिला मतदार 1 लाख 36 हजार 269 तर इतर तीनचा समावेश आहे. 90- देगलूर विधानसभा मतदारसंघात पुरुष 1 लाख 49 हजार 665, महिला मतदार 1 लाख 40 हजार 236 तर इतर तीन असे एकूण 2 लाख 89 हजार 904 मतदार आहेत. तर 91- मुखेड विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 78 हजार 780 मतदार आहेत. यात पुरुष 1 लाख 46 हजार 351, महिला मतदार 1 लाख 32 हजार 425, इतर चार मतदार आहेत, असे एकूण नांदेड लोकसभा मतदार संघात 17 लाख 17 हजार 825 मतदार आज मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.

नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी पोलीस बंदोबस्‍त
नांदेड लोकसभा निवडणूक -२०१९ साठी आज मतदार संघात मतदान शांततेत व सुरळीत पार पाडण्‍यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचे मार्गदर्शन व देखरेखीखाली ५ हजार ६६५ पोलीस अधिकारी , कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. यात पोलीस अधीक्षकांसह अप्‍पर पोलीस अधीक्षक दोन, उपविभागीय पोलीस अधिकारी -१५, पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक -२२२, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक-११०, पोलीस कर्मचारी -४ हजार ३ , होमगार्ड-१ हजार ३१२ असे एकूण ५ हजार ६६५ पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच एसआरपीएफ कंपनी सहा, एसएपी एक कंपनी, क्‍युआरटी चार सेक्‍शन, आरसीपी चार सेक्‍शन असा पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.

सहा सखी मतदान केंद्र
भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून मतदान जागृती अभियान राबवण्यात आले. तसेच इतरांपेक्षा वेगळे आणि सुविधायुक्त मतदान केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करावेत असेही निर्देश होते. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात सहा सखी मतदान केंद्र स्‍थापना करण्‍यात आली आहे.  
केवळ महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती असलेले सखी मतदान केंद्र आणि सर्व प्रकारच्या सुविधा तसेच मतदारांना हवेहवेसे वाटणारे आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत.           ८५-भोकरमध्‍ये मौलाना आझाद विद्यालय (मुदखेड), ८६-नांदेड-उत्तरमध्ये महिला कामगार कल्याण मंडळ (लेबर कॉलनी, नांदेड), ८७- नांदेड दक्षिण गुजराती हायस्‍कूल वजीराबाद, नांदेड,              ८९-नायगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव, ९०-देगलूरमध्ये सावित्रीबाई फुले विद्यालय देगलूर, ९१-मुखेडमध्ये गुरुदेव प्राथमिक शाळा, मुखेड अशी सहा मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आली आहे. या केंद्रावर केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी सहाय्यक आणि शिपाई अशी म्हणजेच सर्व कर्मचारी महिला राहणार असून, या केंद्राची सजावट करून मतदारांचे स्वागतही केले जाणार आहे. 

सहा आदर्श मतदान केंद्र
 नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी सहा मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र करण्‍यात आली आहेत. यामध्‍ये ८५- भोकरमध्‍ये जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा (वाकड), ८६- नांदेड दक्षिण कामगार कल्‍याण मंडळ, लेबर कॉलनी , नांदेड , ८७- नांदेड दक्षिण कामगार कल्‍याण मंडळ, सिडको नवीन नांदेड, ८९- नायगाव कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती , नायगाव , ९०- देगलूर नगर पालिका (नवीन) देगलूर, ९१- मुखेड हुतात्‍मा स्‍मारक , मुखेड हे सहा केंद्र आदर्श मतदार केंद्र म्‍हणून तयार करण्‍यात आले आहे. या मतदान केंद्रावर मतदारांना जाण्या - येण्यासाठी स्वतंत्र रस्ता राहणार आहे. बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था असेल. तसेच गुलाब पुष्प देऊन नवमतदारांचे स्वागत केले जाणार आहे. या मतदान केंद्रावर चहा पाणी, शरबत अशी आदर सत्‍कारासारखी व्यवस्था सखी आणि आदर्श या दोन्ही मतदान केंद्रावर करण्यात आली आहे.

दिव्यांग कर्मचारी चालवणार मतदान केंद्र
नांदेड दक्षिणमधील नेहरू इंग्लिश स्कूल, कला मंदिरमागे, नांदेड  हे मतदान केंद्र दिव्यांग कर्मचारी चालवणार आहेत. केवळ ५४१ मतदार असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून उपलब्ध वेळेत मतदानप्रक्रियेतबदल आवश्यक ते सहाय्य घेण्याच्या दृष्टीने या केंद्राची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात 31 मतदान केंद्राच्या इमारतीचे नाव बदलण्यात आले असून एका मतदान केंद्राच्या नावात बदल करण्यात आला आहे. याशिवाय 36 मतदानकेंद्रांना मतदान केंद्रांना सहाय्यकारी मतदान केंद्रे जोडण्यात आली आहेत.

 दिव्यांगांसाठी अॅटोची व्यवस्था
दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्‍क बजावता यावा, मतदान केंद्रनिहाय अॅटोची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. त्यांच्या मतदार यादीतील पत्त्याच्या ठिकाणापासून ते मतदान केंद्रावर जाण्यासाठी स्वतंत्र ऑटोची व्यवस्था असेल. ज्या मतदारांनी आपली दिव्यांग म्हणून नोंद केली होती, त्यांच्या पोलचिटच्या पाठीमागे संबंधित मतदान केंद्राच्या बीएलओचा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. दिव्यांग मतदारांनी त्या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्या  भागातील अॅटो मतदान करायला दिव्‍यांग मतदाराला घेऊन जाऊन परत आणून सोडेल, अशी व्यवस्थाही प्रथमच नांदेड लोकसभा मतदारसंघात करण्यात आली आहे.

आरोग्‍य विषयक सुविधा उपलब्‍ध
जिल्‍ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आरोग्‍य विषयक सुविधाही पुरविण्‍यात आली आहेत. यामध्‍ये प्रत्‍येक मतदान केंद्रावर प्रथमोचार पेटी उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.

सांयकाळी ६-०० वाजेपर्यंत मतदान
 नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज सकाळी ७-०० वाजल्‍यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सांयकाळी ६-०० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालू राहणार आहे. सांयकाळी ६-०० वाजेदरम्‍यान जे मतदार मतदान केंद्रावर उ‍पस्थित असतील अशा मतदारांना नंबरचे कुपन देवून अशा मतदाराचे मतदान करुन घेण्‍यात येणार आहे.

४६ संवेदनशिल मतदान केंद्र  
      नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्‍ये ४६ संवेदनशिल मतदान केंद्र आहेत. ८५-भोकर जिल्‍हा परिषद हायस्‍कूल, उत्‍तर बाजू, रुम नं.११ लहान ता. अर्धापूर, जिल्‍हा परिषद हायस्‍कूल, देगाव कुराडा, रुम. 7 ता. अर्धापूर, जिल्‍हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्‍या नवीन इमारत , भोकर, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, अमराबाद ता. अर्धापूर, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, जांभळी ता. अर्धापूर, जिल्‍हा परिषद मुलींची शाळा पूर्व बाजूस खोली क्र.५, ता. मुदखेड. ८६ नांदेड उत्‍तर मनपा शाळा, नं. ५, लेबर कॉलनी, नांदेड, नांदेड क्‍लब स्‍नेह नगर, आटीआय हॉल क्र. 4, नांदेड, इस्‍लाहूल आलम माध्‍यमिक मुलांची शाळा, खुदबई नगर, मुखीत फंक्‍शन हॉलच्‍या बाजूला,नांदेड.
८७- नांदेड दक्षिण गांधी राष्‍ट्रीय हिंदी विद्यालय,गाडीपुरा, नांदेड, कामगार कल्‍याण केंद्र, टेक्‍सटाईल मिल,पूर्व बाजू , नांदेड, जिल्‍हा परिषद हायस्‍कूल चौफाळा वर्ग आठवा ,जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, वाजेगाव उत्‍तर बाजू रुम , जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्र.०२, बळीरामपूर, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, शेवडी (बा) ता. लोहा.
८९ - नायगाव ग्रामपंचायत कार्यालय सिंधी ता. उमरी ,जिल्‍हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, जुनी इमारत , गोरठा ता. उमरी, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, नवी इमारत , गोरठा ता. उमरी, जिल्‍हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पूर्व बाजू , उमरी, अंगणवाडी इमारत करखेली ता. धर्माबाद, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा उत्‍तर बाजू, करखेली ता. धर्माबाद, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा बळेगाव ता. उमरी, हुतात्‍मा पानसरे हायस्‍कूल, धर्माबाद , ऊर्दू हायस्‍कूल रुम न.०१ धर्माबाद, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा,बाळापूर ता. धर्माबाद, जिल्‍हा परिषद केंद्रीय शाळा पूर्व बाजू खोली क्र. 2, रत्‍नाळी ता. धर्माबाद, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव ता. धर्माबाद , जिल्‍हा परिषद हायस्‍कूल शाम नगर नरसी ता. नायगांव. ९०- देगलूर जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचाळा,जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, आळंदी, ग्रामपंचायत कार्यालय,रामपूरथडी ,जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा,शेळगाव (सर्व बिलोली), जिल्‍हा परिषद हायस्‍कूल शहापूर ता. देगलूर, ग्रामपंचायत कार्यालय, खानापूर ता. देगलूर ,जिल्‍हा परिषद  केंद्रीय प्राथमिक शाळा, देगलूर , मौलाना अब्‍दुल कलाम आझाद  हायस्‍कूल  देगलूर, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा,ढोसणी ता. देगलूर, धुंडा महाराज कॉलेज, पूर्व बाजू,देगलूर , धुंडा महाराज कॉलेज, पश्चिम बाजू, देगलूर ,जिल्‍हा परिषद हायस्‍कूल, हानेगाव ता. देगलूर .९१- मुखेड जिल्‍हा परिषद हायस्‍कूल, बेटमोगरा ता. मुखेड, जिल्‍हा परिषद हायस्‍कूल , चांडोळा ता. मुखेड, जिल्‍हा परिषद हायस्‍कूल ,हिब्‍बट ता.मुखेड, जिल्‍हा परिषद हायस्‍कूल,जिरगा, ता. मुखेड असे एकूण नांदेड लोकसभा मतदार  संघात ४६ संवेदनशिल मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर सुरळीत मतदान होण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने चोख बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे.

Web Title: Polling for Nanded Lok Sabha polls will be done on 2 thousand and 28 centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.