परभणी कृषी विद्यापीठ आणणार कापसाचे बीटी बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:41 AM2017-12-09T01:41:49+5:302017-12-09T01:42:15+5:30

परभणी कृषी विद्यापीठाने कापसाचे एनएच-४४ बीजी-२ हे बीटी वाण बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असून याबाबत महाबीजसोबत नुकताच करार करण्यात आला आहे़ विद्यापीठाचे हे वाण येणा-या वर्षात सर्वत्र उपलब्ध होणार आहे़

 Parbani Agricultural University brings Bt seeds of cotton | परभणी कृषी विद्यापीठ आणणार कापसाचे बीटी बियाणे

परभणी कृषी विद्यापीठ आणणार कापसाचे बीटी बियाणे

googlenewsNext
ठळक मुद्देमहाबीजसोबत करार : सार्वजनिक क्षेत्रातील पहिले वाण ठरणार

विशाल सोनटक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : परभणी कृषी विद्यापीठाने कापसाचे एनएच-४४ बीजी-२ हे बीटी वाण बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असून याबाबत महाबीजसोबत नुकताच करार करण्यात आला आहे़ विद्यापीठाचे हे वाण येणा-या वर्षात सर्वत्र उपलब्ध होणार आहे़

राज्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते़ महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ व खानदेशमध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होते़ कापूस उत्पादक शेतकरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या नांदेड-४४ या संकरित वाणाला मोठा प्रतिसाद देत होते़ देशभरात या वाणाची जवळपास ५५ ते ६० टक्के लागवड होत असे़ मात्र २००२ च्या सुमारास देशात बीटी कापसाची लागवड सुरु झाली़ त्यानंतर विद्यापीठाचे नांदेड-४४ हे वाण मागे पडले़ बीटी तंत्रज्ञानामुळे २००२ नंतर राज्यातील सरासरी कापूस लागवड क्षेत्र ४६ टक्क्यांनी वाढले़

सरासरी उत्पादकतेतही ६४ टक्क्यांहून अधिकची वाढ झाली़ त्यामुळे राज्यातील कापसाच्या एकूण सरासरी उत्पादनामध्ये १८३ टक्के वाढ झाली़ कापसाचे देशातील सरासरी उत्पादनही १७५ टक्क्यांवर पोहोचले़ त्यामुळेच २००२ पर्यंत कपाशीचा प्रमुख आयातदार असलेला भारत मागील काही वर्षात निर्यातदार राष्ट्र म्हणून पुढे आला़
एनएच-४४ बीजी-२, या बीटी वाणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने महाबीज सोबत नुकताच करार केला असूऩ या संदर्भातील हक्क हस्तांतरणाचे कामही पूर्ण झाले आहे़ २०१७-१८ मध्ये विद्यापीठाचे हे बीटी वाण उपलब्ध होणार असून २०१८-१९ या वर्षापासून ते देशभरात बाजारपेठेत उपलब्ध राहील़
सदर वाण खाजगी कंपन्यांच्या तुलनेत काहीसे स्वस्त असेल, असे नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रातील प्रा़ अरविंद पांडागळे यांनी सांगितले़

शेतक-यांसाठी मोठा दिलासा...
कपाशीवर चार प्रकारच्या अळ्यांचा प्रार्दुभाव होतो़ यात हिरवी बोंड, ठिपक्यांची, लष्करी आणि गुलाबी म्हणजेच शेंदरी बोंडअळी या चारही अळ्यांवर मात करण्याची क्षमता बीटी कॉटनमध्ये होती़ त्यामुळेच २००२ पासून २०१६ पर्यंत गुजरात वगळता देशाच्या इतर भागात कपाशीवर रोगाचा फारसा प्रार्दुभाव झालेला नव्हता़ मात्र इतर अळीच्या तुलनेत शेंदरी बोंडअळी बोंडामध्ये शिरुन बोंड गीळंकृत करते़ गुजरातमध्ये २०१५ मध्ये याच शेंदरी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते़ हेच लोण यावर्षी महाराष्ट्रातही धडकले़ गुलाबी बोंडअळीने कापसाचे पीक फस्त केल्याने सध्या महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आला आहे़ अशा स्थितीत कृषी विद्यापीठाचे हे नवे बीटी वाण येणाºया काळात शेतक-यांसाठी दिलासादायक ठरणार आहे़

खिजर बेग म्हणतात...
दीर्घ कालावधीच्या वाणाची लागवड केल्याने शेंदरी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले़ अशा स्थितीत कुलगुरु डॉ़ बी़वेंकटेश्वरलू यांच्या पुढाकाराने येत असलेले विद्यापीठाचे बीटी वाण शेतकºयांसाठी दिलासादायक ठरेल़
- डॉ़ खिजर बेग
कापूस विशेषतज्ज्ञ,
कापूस संशोधन केंद्र, नांदेड

Web Title:  Parbani Agricultural University brings Bt seeds of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.