नांदेडमधील २४२ शेतकरी झाले रातोरात करोडपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:56 PM2018-05-22T13:56:22+5:302018-05-22T14:39:12+5:30

हदगाव तालुक्यातील ७ गावांतून जात आहे़ यासाठी ५४़४५१७ हेक्टर आर जमीन संपादित करण्यात आली़ जमिनीच्या मावेजापोटी शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम कोटीत आहे़

Over 242 farmers of Hadagawa are crorepatis; Lottery took from money amount | नांदेडमधील २४२ शेतकरी झाले रातोरात करोडपती

नांदेडमधील २४२ शेतकरी झाले रातोरात करोडपती

Next
ठळक मुद्देसात गावांतून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने मावेजापोटी मिळत असलेल्या रकमेने शेतकऱ्यांना कोट्यधीश केले़ तालुक्यात रस्ते प्रकल्पाची लांबी २९़२० कि़मी़ आहे़ त्यासाठी संपादित करावयाचे एकूण क्षेत्र ८३़५१४० हेक्टर आर एवढे आहे़

- सुनील चौरे
हदगाव (नांदेड ) : ‘भगवान देता है तो छप्पर फाड के’ या म्हणीचा प्रत्यय तालुक्यातील २४२ शेतकरी कुटुंबियांना झाला़ नियोजित तुळजापूर-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग हदगाव तालुक्यातील ७ गावांतून जात आहे़ यासाठी ५४़४५१७ हेक्टर आर जमीन संपादित करण्यात आली़ जमिनीच्या मावेजापोटी शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम कोटीत आहे़ एका रातोरात तालुक्यातील २४२ शेतकरी कोट्यधीश झाले़ सात गावांतून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने मावेजापोटी मिळत असलेल्या रकमेने शेतकऱ्यांना कोट्यधीश केले़ 

सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे वर्णन करणे अवघड आहे़ नापिकी, पाणीटंचाई, शेतीला अल्प भाव यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले़ अशातच एक सुखद वार्ता हाती आली़ तालुक्यातील गोजेगाव, हदगाव, कवठा, अंबाळा, पळसा, बरडशेवाळा, बामणी, चिंचगव्हाण, शिबदरा, मनाठा, चोरंबा (ना़), वाकोडा, करमोडी या गावातील १२़१६८१ हेक्टर आर. पैकी ६़९९०५ हेक्टर आर.जमिनीचे संपादन करण्यात आले़ शेतकऱ्यांना ७९ कोटी १७ लाख ५९० रुपये २५ पैसे एवढ्या रकमेचे वाटप करण्यात आले़ 

तालुक्यात रस्ते प्रकल्पाची लांबी २९़२० कि़मी़ आहे़ त्यासाठी संपादित करावयाचे एकूण क्षेत्र ८३़५१४० हेक्टर आर एवढे आहे़ पैकी ५८़४५१७ हेक्टर आर संपादित करण्यात आलेले क्षेत्र आहे़ तर संपादन करायचे शिल्लक क्षेत्र २५़०६२३ हेक्टर आर आहे़ ताबा दिलेले क्षेत्र ४६़०१८० हेक्टर आर असून ताबा घ्यावयाचे उर्वरित क्षेत्र १२़४३३७ हेक्टर आर एवढे आहे़ संपादित संस्थेकडून मोबदल्याची जमा रक्कम १४५ कोटी ७२ लाख ८० हजार ८६ रुपये आहे़ पैकी वाटप करण्यात आलेली मोबदल्याची रक्कम ७९ कोटी १७ लाख ५९ हजार २५ रुपये एवढी आहे़

यामध्ये पळसा संपादित क्षेत्र १२़६५४७ हेक्टर आर मोबदला ४२ कोटी ९ लाख ६ हजार २७ रुपयांपैकी वाटप करण्यात आलेली रक्कम २२ कोटी ८१ लाख २६ हजार ९९६ रुपये आहे़ बरडशेवाळा संपादित क्षेत्र १२़७१०० हेक्टर मोबदला ६६ कोटी ५३ लाख ७३७८ पैकी वाटप रक्कम ११ कोटी ९० लाख ५० हजार ६०३, बामणी क्षेत्र ६़३४४८ हेक्टर, ताबा ४़३१७७ हेक्टर मोबदला १७ कोटी ३७ लाख १६ हजार १८३ पैकी ११ कोटी ७३ लाख ५५ हजार १७३ रुपये वाटप, चिंचगव्हाण एकूण क्षेत्र ३़९८०० हेक्टर आर, ताबा ३़८२०० हेक्टर आर, मोबदला ९० कोटी ४३ लाख ९ हजार १०४ रुपये, वाटप ७६ कोटी ४७ हजार ९१२ रुपये, शिबदरा एकूण क्षेत्र ६़९९८० पैकी ६़७८५६ हेक्टर, मोबदला २४ कोटी ७७ लाख ५१ हजार ६१८ पैकी १२ कोटी ५९ लाख ४ हजार ६१३ रुपये वाटप, मनाठा क्षेत्र ३़३२४६ हेक्टरपैकी १़०४०० हेक्टर ताबा, एकूण मोबदला ३८ कोटी ६ लाख ३७ हजार २५२ रुपये पैकी ४ कोटी ७३ हजार ६३८ रुपये वाटप, चोरंबा ना़ ४़६९०० हेक्टर मोबदला १७ कोटी २१ लाख ५८ हजार ३१९ रुपये मिळाले आहे़ 

काही प्रकरणे प्रलंबित 
शेतकऱ्यांना शेतजमिनीसह झाडे, विहीर, बोअर, बांधलेली घरे यांचाही मोबदला देण्यात  आला़ अनेक कुटुंबातील अंतर्गत वादामुळे काही प्रकरणे प्रलंबित आहेत़ मे अखेरपर्यंत अशी सर्व प्रकरणे मार्गी लागतील.     
- महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी, हदगाव

Web Title: Over 242 farmers of Hadagawa are crorepatis; Lottery took from money amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.