आमच्या टीमचे खेळाडू 'पाकिस्तान'कडून खेळतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:29 AM2018-04-26T00:29:31+5:302018-04-26T00:29:31+5:30

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सामूहिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. मात्र आमच्या टीमचे खेळाडू ‘पाकिस्तान’कडून खेळत आहेत. त्यामुळे अवैधधंदे काही प्रमाणात सुरुच आहेत.

Our team players play 'Pakistan' | आमच्या टीमचे खेळाडू 'पाकिस्तान'कडून खेळतात

आमच्या टीमचे खेळाडू 'पाकिस्तान'कडून खेळतात

Next
ठळक मुद्देखुद्द पोलीस अधीक्षकांनीच केली माहिती उघड

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सामूहिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. मात्र आमच्या टीमचे खेळाडू ‘पाकिस्तान’कडून खेळत आहेत. त्यामुळे अवैधधंदे काही प्रमाणात सुरुच आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ठाण्यात असलेले गुन्हे शोध पथके गुन्ह्यांचा शोध लावण्याऐवजी दुसरीच कामे करीत असल्याचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सांगितले.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना पोलीस अधीक्षकांची सर्व जबाबदारी असली तरीही गुन्ह्यावर आळा घालणे, अवैध धंदे रोखणे हे काम सामूहिक आहे. आजघडीला जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात अवैध धंदे चालू असतील हे नाकारता येत नाही. त्यांना आळा घालण्याची जबाबदारी असलेले गुन्हे शोध पथके अकार्यक्षम आहेत, असे म्हणता येणार नाही. मात्र ते मूळ काम सोडून दुसऱ्याच कामात व्यस्त आहेत. अशा सर्व पोलिसांची यादी आपल्याकडे आल्याचे स्पष्ट करताना पोलीस दलात मोठे फेरबदल लवकरच दिसून येतील, असेही पोलीस अधीक्षक मीना यांनी स्पष्ट केले. अवैध धंद्यांवर आळा घालताना आमच्या टीमचे खेळाडू पाकिस्तानकडून खेळतात अर्थात अवैध धंदेचालकासमवेत असल्याचेही ते म्हणाले. एकूणच आगामी काळात पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

गुरमेवर कारवाई, चिंचोलकरचीही चौकशी
स्थानिक गुन्हे शाखा पोलीस दलातील महत्त्वाचा घटक आहे. या विभागाकडून मोठ्या कामाची अपेक्षा असते. मात्र जिल्ह्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या कारभाराच्या तक्रारीच जास्त आहेत. पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्याबाबत वर्षभरापासून तक्रारी येत होत्या. त्या तक्रारींची शहानिशा केली असता काही प्रमाणात त्यात तथ्यही आढळले. परिणामी अशा गैरप्रकारांना आळा घालणे आवश्यक होते. म्हणूनच त्यांना स्थानिक गुन्हे शाखेतून हटविले़ त्याचवेळी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची चौकशी सुरू आहे. त्यांना एलसीबीत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले.

वाळू प्रकरणात पर्यावरणाची हानी
पोलिसांनी जिल्ह्यात वाळू घाटावर कारवाई केली. सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी ही कारवाई करताना स्थानिक पोलीस मात्र आतापर्यंत काय करीत होते? हा प्रश्न उपस्थित करताना महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी बोट ठेवले. अवैध वाळू उपसा रोखण्याची मूळ जबाबदारी महसूल विभागाची आहे. वाळू उपसा करण्यासाठी जेसीबीची परवानगी नाही. मात्र खुलेआम जेसीबीचा वापर होतो. कायद्याचे उल्लंघन होताना पोलीस निश्चितच कारवाई करु शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Our team players play 'Pakistan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.