Order for quitting the water of Penganga for Nanded | नांदेडसाठी पैनगंगा प्रकल्पाचे पाणी सोडण्याचे आदेश
नांदेडसाठी पैनगंगा प्रकल्पाचे पाणी सोडण्याचे आदेश

ठळक मुद्देसांगवी बंधाऱ्यात दोन दिवसांत उपलब्ध होणार पाणी

नांदेड : शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पैनगंगा प्रकल्पातून दोन दलघमी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. सदर पाणी हे सांगवी बंधाºयात अडवून पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पुरविण्यात येणार आहे.
नांदेड शहरासाठी विष्णूपुरी प्रकल्पात ३० दलघमी तर पैनगंगा प्रकल्पात १५ दलघमी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. यापैकी २ दलघमी पाणी यापूर्वीच महापालिकेने घेतले आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने होत असलेली घट पाहता एप्रिलनंतर शहराचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे पैनगंगा प्रकल्पात राखीव असलेले पाणी महापालिका टप्प्याटप्याने घेत आहे. दुस-या टप्प्यात पाणी देण्याचे आदेश ११ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. हे पाणी दोन दिवसांत सांगवी बंधा-यात पोहोचणार आहे.
पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे हे पाणी सांगवी बंधा-यातून काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रात घेतले जाईल. त्यानंतर उत्तर नांदेडातील काही भागाला पैनगंगा प्रकल्पातील पाणीपुरवठा केला जाणार आहे. जवळपास महिनाभर हे पाणी सदरील भागाला उपयुक्त ठणार आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा पाणी उपसा कमी प्रमाणात होईल, असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले़ पैनगंगा प्रकल्पात महापालिकेसाठी १५ पैकी ४ दलघमी पाणी उचलण्यात येत आहे. उर्वरित ११ दलघमी पाणी गरजेप्रमाणे घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.

 


Web Title: Order for quitting the water of Penganga for Nanded
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.