Opposition demands rehearsals in Kharda case | खर्डा प्रकरणात फेरचौकशीच्या मागणीसाठी निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे हत्या प्रकरणाची फेरचौकशी करावी या मागणीसाठी गुरुवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रिसर्च स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
राज्यात गाजलेल्या नितीन आगे हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला निर्दोष सोडले आहे. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व २६ जणांनी या प्रकरणात साक्ष फिरविली होती. या प्रकरणात योग्य दिशेने तपास झाला असता तर आरोपींना शिक्षा झाली असती.
मात्र असे घडले नाही. याप्रकरणाची फेरचौकशी करावी, या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करावा, तपास करणाºया तत्कालीन पोलीस अधिकाºयांना निलंबित करावे, सर्वच दलित अत्याचाराच्या प्रकरणात घटनेतील साक्षीदारांच्या साक्षीचे व्हिडीओ चित्रीकरण करावे, नितीन आगेच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनात रिसर्च स्टुडंट्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष साहेबराव गजभारे, किरण फुले, आनंद घोडवाडीकर आदींचा समावेश होता.