नांदेड जिल्ह्यात बोगस अध्यादेशाद्वारे बेरोजगारांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:12 AM2018-05-03T01:12:36+5:302018-05-03T01:12:36+5:30

Noded district bogus ordinance unemployed | नांदेड जिल्ह्यात बोगस अध्यादेशाद्वारे बेरोजगारांना गंडा

नांदेड जिल्ह्यात बोगस अध्यादेशाद्वारे बेरोजगारांना गंडा

googlenewsNext
ठळक मुद्दे११ जणांविरुद्ध गुन्हा : ७० विद्यार्थ्यांनी केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड :राज्य शासनाचा बोगस अध्यादेश दाखवून संगणक शिक्षकाची जागा भरायची आहे असे म्हणून शेकडो विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २ ते ४ लाख रुपये स्वीकारुन गंडा घालणाऱ्या अकरा जणांच्या टोळीविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ यातील सुधाकर किशन पवार या आरोपीला लोहा येथून अटक करण्यात आली आहे़
शहरातील चैतन्यनगर येथील श्रेया कॉम्प्युटरसमोर मधुकर पतंगे यांच्या कार्यालयात या प्रकरणातील आरोपींनी हे सर्व कुभांड रचले़ शासनाचा बोगस अध्यादेश आणि शासन राजपत्राचा नमुना तयार करुन एका टोळीने २०१५ पासून जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे़ शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये संगणक सहाय्यकाच्या जागा रिक्त असून त्या लवकर भरावयाच्या आहेत़ असे सांगून बेरोजगार विद्यार्थ्यांना आमिष दाखविण्यात आले़ त्यांच्याकडून नोकरीसाठी प्रत्येकी २ ते ३ लाख रुपये घेण्यात आले़ ही अग्रीम रक्कम असून प्रत्यक्षात नोकरी लागल्यानंतर उर्वरित रक्कम द्यावयाची आहे, असेही सांगण्यात आले़ विद्यार्थ्यांना संशय येवू नये म्हणून चैतन्यनगर येथील श्रेया कॉम्प्युटर आणि लोहा येथील सायबर कॉम्प्युटर या दोन ठिकाणी या विद्यार्थ्यांना एक महिन्याचे प्रशिक्षणही देण्यात आले़ त्यासाठी नेमण्यात आलेल्या प्रशिक्षकाला अडीच हजार रुपये मानधनावर एक महिन्यासाठी नियुक्त करण्यात आले होते़ त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीची बनावट नियुक्तीपत्रेही देण्यात आली़ ही नियुक्तीपत्रे देताना शंभर रुपयांच्या बॉन्डवर विद्यार्थ्यांकडून करारनामा करण्यात आला़
परंतु पैसे दिल्यानंतरही नोकरी न लागल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलेल्या विद्यार्थ्यांनी सुधाकर पवार व इतरांकडे रकमेची मागणी केली़ यावेळी पवार व त्याच्या साथीदारांनी या विद्यार्थ्यांना पैसे नसलेल्या बँक खात्याचे धनादेश दिले़ ते धनादेशही वटले नाहीत़ त्यानंतर जवळपास ७० विद्यार्थ्यांनी एमपीएससी भरती प्रकरणाचे रॅकेट उघड करणाºया योगेश जाधव यांची भेट घेतली़ याप्रकरणी योगेश जाधव यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ आतापर्यंत या आरोपींनी ७० जणांकडून अशाप्रकारे लाखो रुपये उकळले असल्याची माहिती हाती आली आहे़ हा आकडा मोठा असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली़
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत़ यातील सुधाकर किशन पवार याला लोह्यातून अटक करण्यात आली. बुधवारी त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़

Web Title: Noded district bogus ordinance unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.