समाजाच्या प्रश्नासाठी एकजुटीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:23 AM2018-08-13T00:23:22+5:302018-08-13T00:23:26+5:30

मराठा समाज लाखात असूनही त्यांचा परिणाम कोणत्या राजकीय पक्षावर होत नाही़ मराठा समाजाची स्वतंत्र आणि एकसंघ वोट बँक तयार होणे गरजेचे असून त्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले़

Need for a problem for the community's question | समाजाच्या प्रश्नासाठी एकजुटीची गरज

समाजाच्या प्रश्नासाठी एकजुटीची गरज

Next
ठळक मुद्देमराठा युवकांशी संवाद : हर्षवर्धन जाधव यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मराठा समाज लाखात असूनही त्यांचा परिणाम कोणत्या राजकीय पक्षावर होत नाही़ मराठा समाजाची स्वतंत्र आणि एकसंघ वोट बँक तयार होणे गरजेचे असून त्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले़
रविवारी ‘मराठा युवा मन परिवर्तन यात्रा’निमित्त नांदेडात आले असता त्यांनी मराठा युवकांशी संवाद साधला़ औरंगाबादचे प्रा़चंद्रकांत भराट, मानसोपचार तज्ज्ञ इशा झा, डॉ़शाम पाटील, विलास तांगडे यांच्यासह डॉ़संजय कदम, भागवत देवसरकर, पंजाबराव काळे, धनंजय सूर्यवंशी, शाम पाटील वडजे, अविनाश कदम, संदिप पावडे, मारूती देशमुख नरंगलकर, इंजि़पी़ आऱ देशमुख, माधव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती़ प्रास्ताविक डॉ़संजय कदम यांनी केले़
आरक्षणाच्या लढाईत अनेकांनी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाऊन, स्वत:वर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून घेतले आहेत़ ही लढाई एवढ्यावरच न थांबता मागील काही दिवसात मराठवाड्यात जवळपास २७ युवक-युवतींनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले़
आत्महत्यांचे सत्र सुरूच असून ते कुठेतरी थांबले पाहिजे़ यासाठी एक मराठा बांधवा या नात्याने मराठवाड्यात ‘मराठा युवा मन परिवर्तन यात्रा’ काढली असल्याचे आ़ जाधव यांनी सांगितले़
शांततेच्या मार्गाने अठावन्न मुकमोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाचा अंत न पाहता सरकारने समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत़ आरक्षण देण्यासाठी कोणत्याही अहवालाची गरज नसून विधिमंडळात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येवून हा प्रश्न मार्गी लावता येवू शकतो़ परंतु, राजकीय स्वार्थापोटी अनेकजण दुटप्पी भूमिका घेत आहेत, असा आरोप आ़जाधव यांनी केला़ मराठा समाज आत्महत्या करीत असल्याचे पाहून सरकारवर दबाव आणण्यासाठी आपण राजीनामा दिला़ परंतु, त्याचे काही मंडळी राजकारण करीत आहेत ते चुकीचे आहे़ मला समाजाचे नेतृत्व करायचे नाही किंवा कोणता राजकीय पक्ष काढायचा नाही़
यात कुठलाही राजकीय स्वार्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ परंतु, मराठा समाज कोणत्याही एका पक्षाच्या मागे नसल्याने तो विविध पक्षात विखुरला गेल्याने लाखांमध्ये असूनही त्यांचा सरकारवर दबाव निर्माण होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ मराठा आरक्षणासाठी एकट्या मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणे योग्य नसून सर्वांनी समाजाला न्याय देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत आ़जाधव यांनी व्यक्त केले़
---

  • तरूणांनो आत्महत्या नको; लढणे आपल्या रक्तात

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणे, रस्त्यावर उतरणे इतपर्यंत ठिक आहे़ परंतु, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलने आपल्या शोभणारे नाही़ आपण शिवरायांच्या रक्ताचे वंशज असून लढणे हे आपल्या रक्तात आहे़ त्यामुळे आत्महत्या न करता शासनावर अहिंसक, लोकशाही मार्गाने आपण दबाव आणू परंतु, आत्महत्या नको, असे आवाहन आ़हर्षवर्धन जाधव यांनी केले़

  • जीवन अनमोल आहे ते गमवू नका- इशा झा

जगण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात संषर्ष असतो़ परंतु, तो संघर्ष विकोपाला जावून आत्महत्या करणे हा पर्याय नाही़ आयुष्यातील संघर्षावर मार्ग शोधून जगणं गरजेचे आहे़ आत्महत्या हा पर्याय नाही, असे मत मानसोपचार तज्ज्ञ इशा झा यांनी व्यक्त केले़ कोणी नैराश्यात असेल आत्महत्येसारखे विचार मनात येत असतील तर त्यांना समुपदेशनसाठी आमच्यापर्यंत घेवून यावे़

Web Title: Need for a problem for the community's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.