राष्ट्रीय महामार्ग रस्ता बनला चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:33 AM2018-07-16T00:33:24+5:302018-07-16T00:33:47+5:30

मागील काही दिवसांपासून भोकरफाटा ते भोकर राष्ट्रीय महामार्ग कामास सुरुवात करण्यात आली होती़ मात्र हे काम सहा महिन्यांपासून बंद पडले आहे़ अर्धवट केलेल्या कामावर माती असल्याने पावसाने चिखल झाला असून राष्ट्रीय महामार्ग चिखलमय बनला आहे़

 National highway road became muddy | राष्ट्रीय महामार्ग रस्ता बनला चिखलमय

राष्ट्रीय महामार्ग रस्ता बनला चिखलमय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बारड : मागील काही दिवसांपासून भोकरफाटा ते भोकर राष्ट्रीय महामार्ग कामास सुरुवात करण्यात आली होती़ मात्र हे काम सहा महिन्यांपासून बंद पडले आहे़ अर्धवट केलेल्या कामावर माती असल्याने पावसाने चिखल झाला असून राष्ट्रीय महामार्ग चिखलमय बनला आहे़
महामार्गावर दहा चाकी अवजड वाहने फसण्याच्या घटना दररोज घडत असून वाहने फसल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे़ भोकरफाटा ते भोकर हा राष्ट्रीय महामार्ग धोकादायक बनल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. दरम्यान, वाहनधारकांना महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून सहकार्य मिळत असल्याने वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे़
महामार्गावरील खरबीपासूनचा समोरील रस्ता चिखलमय झाल्याने भोसीजवळ दररोज अवजड ट्रक फसण्याच्या घटना घडतात़ १३ जुलैै रोजी बारा चाकी ट्रक फसल्याची घटना घडल्याने महामार्ग सकाळी ७ वाजल्यापासून १ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद होता़ बारड महामार्ग पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली़ महामार्ग पोलीस कर्मचारी देवघरे, ए.एस.आय.महाबळे, हुंबडे, पोना चनाजोलु, सुरनर, धुळगंडे, फारूकी, पोतदार आदींनी मदतीसाठी परिश्रम घेतले़
हा रस्ता धोकादायक बनल्याने भोकरफाटा ते भोकर जाण्यासाठी चार तास वेळ लागत असून रस्त्यावरुन वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे़ जीव मुठीत धरून रस्त्यावरून वाहन चालवावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील वाहन- चालकांनी व्यक्त केली आहे.
महामार्ग रस्त्याचे काम अर्धवट असल्याने राष्ट्रीय महामार्ग रस्ता हा चढउतार बनल्याने दररोज अपघाती घटना घडत आहेत. पांढरवाडी, बारड महामार्ग रस्त्यावर आंबेगाव कॉर्नरजवळील रस्त्यावर मोठमोठी दहा बाय दहा या आकाराचे खड्डे पडली असल्याने महामार्ग रस्त्यावर पाण्याचे डबके साचून असल्याने महामार्गावरील खड्ड्यातील पाण्यातून रस्ता शोधताना दररोज वाहनधारकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. खैरगावपासून येळेगावपर्यंत रस्ता हा चाळणी झाला असून मोठमोठ्या प्रमाणात खड्डे आहेत़

Web Title:  National highway road became muddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.