नांदेडकरांची पाण्यासाठी भटकंती; ३० मे पासूनच विष्णूपुरी प्रकल्प कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 03:07 PM2019-06-10T15:07:33+5:302019-06-10T15:10:02+5:30

शहरात अपुऱ्या टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत़

Nandedkar's on huntning for water; Vishnupuri dam dry from May 30 | नांदेडकरांची पाण्यासाठी भटकंती; ३० मे पासूनच विष्णूपुरी प्रकल्प कोरडा

नांदेडकरांची पाण्यासाठी भटकंती; ३० मे पासूनच विष्णूपुरी प्रकल्प कोरडा

googlenewsNext
ठळक मुद्देचालू वर्षी ३० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले होते़प्रत्यक्षात मृतजलसाठाही अत्यल्प असून कसेबसे पंप सुरू आहेत़

नांदेड : नांदेडकरांची तहान भागवणारा विष्णूपुरी प्रकल्प ३० मे पासूनच कोरडा झाल्याने पाण्यासाठी शहरवासियांची भटकंती सुरू आहे़ शहरातील अनेक भागात तब्बल १० ते १२ दिवसांपासून पाणी आले नाही़ त्याचवेळी शहरात अपुऱ्या टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत़

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो़ चालू वर्षी ३० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले होते़ त्यातच दिग्रस बंधाऱ्यातूनही नांदेडला पाणी घेण्यात आले होते़ मात्र पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने आणि विष्णूपुरी प्रकल्पातून अवैधरित्या होणारा पाणीउपसा रोखण्यास प्रशासनाला अपयश आल्याने मे मध्येच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातील मृत जलसाठ्यातून नांदेडकरांची तहान ३१ जुलैपर्यंत भागेल असे महापालिकेने म्हटले होते़ मात्र प्रत्यक्षात मृतजलसाठाही अत्यल्प असून कसेबसे पंप सुरू आहेत़ आता प्रशासकीय स्तरावर ऐनवेळी सिद्धेश्वर धरणातून पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत़

प्रत्यक्षात सिद्धेश्वर धरणातही मृत जलसाठाच शिल्लक आहे़ त्यामुळे या प्रकल्पातून पाणी घेणार किती आणि त्यातील किती पाणी विष्णूपुरीपर्यंत पोहचेल हाही एक प्रश्नच आहे़ तब्बल १२० कि़मी़ अंतर कापून हे पाणी विष्णूपुरीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ हे पाणी आल्यानंतरच शहरवासियांची तहान भागणार आहे़. शहरात पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडालेली असताना महापालिकेचे पदाधिकारी मात्र कुठेही पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढे आल्याचे अद्याप तरी दिसले नाहीत़  

Web Title: Nandedkar's on huntning for water; Vishnupuri dam dry from May 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.