नांदेडात शिवसेनेला पुनरूज्जीवन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:44 AM2018-01-18T00:44:13+5:302018-01-18T00:44:42+5:30

नांदेड महापालिका आणि त्यानंतर किनवट नगरपालिका निवडणुकीत सफाया झाल्यानंतर मरगळ आलेल्या शिवसेनेला पुनर्जिवित करण्यासाठी नूतन पालकमंत्री रामदास कदम यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला शमवण्याची जबाबदारीही कदम यांच्यावर राहणार आहे.

Nandedata Shivsena Renaissance? | नांदेडात शिवसेनेला पुनरूज्जीवन?

नांदेडात शिवसेनेला पुनरूज्जीवन?

googlenewsNext
ठळक मुद्देखांदेपालट : तीन वर्षांत तिसरे पालकमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड महापालिका आणि त्यानंतर किनवट नगरपालिका निवडणुकीत सफाया झाल्यानंतर मरगळ आलेल्या शिवसेनेला पुनर्जिवित करण्यासाठी नूतन पालकमंत्री रामदास कदम यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला शमवण्याची जबाबदारीही कदम यांच्यावर राहणार आहे.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची नियुक्ती बुधवारी करण्यात आली. आॅक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणाºया पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे आता नांदेडची जबाबदारी दिली आहे. मनपासह किनवट नपमध्येही शिवसेनेचा सफाया झाला आहे. महापालिकेत शिवसेनेच्या गद्दारांना निवडून येवू देणार नाही, अशी जाहीर भूमिका पर्यावरणमंत्री कदम यांनी घेतली होती. भाजपाला रोखण्याच्या प्रयत्नात शिवसेना नांदेड महापालिकेत नावालाच उरली. किनवटमध्ये तर एकही जागा मिळवता आली नाही. तत्कालीन पालकमंत्री राहिलेल्या अर्जुन खोतकर यांनीही नांदेडच्या राजकारणात विशेष असे लक्ष दिले नाही. केवळ बैठका व काही कौटुंबिक सोहळ्यांपुरता खोतकर यांचा नांदेड दौरा राहत असे. ही बाब शिवसैनिकांनाही खटकणारी होती. खोतकर यांच्या विरोधात आमदारांनीही पक्षप्रमुखाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर खोतकर हे नांदेडपासून अंतर राखूनच होते. त्यातच त्यांच्या स्वत:च्या आमदारकीचा न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर ते नांदेडपासून पूर्णत: अलिप्त झाले. जवळपास वर्षभराची कारकिर्द राहिलेल्या अर्जुन खोतकर यांना मात्र नांदेडमध्ये शिवसेनेला मजबुती देता आली नाही, हे वास्तव आहे.
पालकमंत्री कदम यांच्या नियुक्तीनंतर गोदावरी शुद्धीकरणाच्या उपाययोजनांना वेग येईल, अशी अपेक्षा आहे. गोदावरी शुद्धीकरणामध्ये स्वत: पर्यावरणमंत्री कदम यांनी लक्ष घातले होते.

Web Title: Nandedata Shivsena Renaissance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.