नांदेडमध्ये शाळेत घुसून शिक्षकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:28 AM2019-01-20T00:28:46+5:302019-01-20T00:29:33+5:30

चिरागगल्ली भागातील शारदा शिक्षण भवनच्या हायस्कूलमध्ये घुसून एकाने शिक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली़ घटनेनंतर शाळेतील सर्व शिक्षकांनी इतवारा पोलीस ठाणे गाठले होते़

In Nanded, the teacher was beaten into school | नांदेडमध्ये शाळेत घुसून शिक्षकाला मारहाण

नांदेडमध्ये शाळेत घुसून शिक्षकाला मारहाण

Next

नांदेड : चिरागगल्ली भागातील शारदा शिक्षण भवनच्या हायस्कूलमध्ये घुसून एकाने शिक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली़ घटनेनंतर शाळेतील सर्व शिक्षकांनी इतवारा पोलीस ठाणे गाठले होते़ या प्रकरणात शिक्षकाने इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़ पोलिसांकडून या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती़
शारदा भवन हायस्कूलच्या प्रांगणात विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात येते़ परंतु या ठिकाणी बाहेरील तरुण मैदानावर येऊन नेहमी गोंधळ घालतात़ अनेकवेळा विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकारही घडतात़ त्यामुळे शाळा प्रशासनाने बाहेरच्या व्यक्तींना शाळेच्या प्रांगणात येण्यास अटकाव घातला आहे़ दरम्यान, शनिवारी परिसरातील एक अल्पवयीन मुलगा त्याच कारणामुळे चिडला होता़ तो मैदानावर उभा असताना वाय़एसक़ोल्हेवाड यांनी त्याला हटकले़ त्याचा राग मनात धरुन त्याने कोल्हेवाड यांच्याशी वाद घालत त्याने हातातील कड्याने त्यांच्या चेहऱ्यावर बुक्क्या मारल्या़
या घटनेत कोल्हेवाड हे जखमी झाले होते़ त्यांच्या नाका-तोंडाला जबर दुखापत झाली होती़ त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी मारहाण करणाºया अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन इतवारा पोलीस ठाणे गाठले होते़ या ठिकाणी कोल्हेवाड यांच्या तक्रारीवरुन पुढील कारवाई सुरु होती़

Web Title: In Nanded, the teacher was beaten into school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.