नांदेड महापालिकेची पुरवठा विभागाची ठेकेदारास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:58 AM2018-07-23T00:58:13+5:302018-07-23T00:58:40+5:30

शासकीय वितरण व्यवस्थेसाठी असलेले धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने वाहतूक कंत्राटदारास नोटीस बजावली आहे. त्यात पोलिसाकडूनही या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

Nanded Municipal Corporation's contractor's notice to the contractor | नांदेड महापालिकेची पुरवठा विभागाची ठेकेदारास नोटीस

नांदेड महापालिकेची पुरवठा विभागाची ठेकेदारास नोटीस

Next
ठळक मुद्देगव्हाचा काळा बाजार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शासकीय वितरण व्यवस्थेसाठी असलेले धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने वाहतूक कंत्राटदारास नोटीस बजावली आहे. त्यात पोलिसाकडूनही या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.
नांदेड येथील जवाहरनगर भागात असलेल्या केंद्रीय खाद्य निगमच्या गोदामातून नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यासाठी अन्न-धान्य पुरवठा केला जातो. बुधवारी रात्री पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातील ७ आणि नांदेड जिल्ह्यातील ३ असे १० ट्रक नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनी लि. येथे जात असताना पकडले. येथील तीन ट्रक नांदेड जिल्ह्यातील असल्याने पुरवठा विभागाने या प्रकरणात वाहतूकदार पारसेवार अ‍ॅन्ड कंपनीला नोटीस बजावत खुलासा मागितला आहे. १९ जुलै रोजी हा खुलासा मागवण्यात आला होता. या प्रकरणात दोषी आढळल्यास वाहतूक कंत्राट रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. २० जुलै रोजी वाहतूक कंत्राटदार पारसेवार अ‍ॅन्ड कंपनीने खुलासा देत पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील तीन ट्रक हे नांदेड-नायगाव महामार्गावरील कृष्णूरनजीक असलेल्या रामदेव ढाबा येथूनच ताब्यात घेतल्याचे खुलाशात म्हटले आहे. पुरवठा विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे वाहतूक ठेकेदाराने दिलेला खुलासा ग्राह्य धरल्यास पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात पुरवठा संतोष वेणीकर यांनी आताच अधिक काही सांगता येणार नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांकडून या प्रकरणात कागदपत्र प्राप्त होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील तीन ट्रक हे कुंडलवाडी, मुक्रमाबाद आणि अन्य एका ठिकाणी जात होते. हे तिन्ही ट्रक सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निघाले असल्याचीही माहिती मिळाली.
दरम्यान, पोलीस विभागाने या प्रकरणात पुरवठा विभागाकडून काही कागदपत्रेही ताब्यात घेतले आहेत़
---
एफसीआयच्या गोदामावर नियंत्रण नाही
फूड कॉर्पोेरेशन आॅफ इंडिया अर्थात केंद्रीय खाद्य निगम गोदामातून पुरवठा विभागासह जिल्हा परिषद, बालविकास विभाग तसेच व्यापाऱ्यांनाही धान्य पुरवठा केला जातो.या गोदामातून शासकीय गोदामात धान्य पोहोचवले जाते. त्यानंतर स्वस्त धान्य दुकानावर माल वाटप केला जातो.या सर्व प्रक्रियेत त्या- त्या तहसीलदारांकडून आवश्यक ते धान्य निश्चित केले जाते. धान्य निश्चित केल्यानंतर एफसीआयच्या मनमाड येथील कार्यालयात धनादेश देवून चालान घेतले जाते. या चालानद्वारे धान्याची उचल केली जाते. हिंगोली जिल्ह्यात एफसीआयचा बेस डेपो नसल्याने नांदेड येथूनच धान्य उचलले जाते.

Web Title: Nanded Municipal Corporation's contractor's notice to the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.