नांदेड मनपात एकमेव अपक्षाचा विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:37 AM2018-02-23T00:37:16+5:302018-02-23T00:37:40+5:30

महापालिकेत सुरू असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाचे त्रांगडे कायम असताना महापौर शीलाताई भवरे यांनी या पदासाठी अपक्ष नगरसेवक संदीपसिंघ गाडीवाले यांनीही दावा केल्याची माहिती दिली आहे़ त्यामुळे या सर्व प्रकरणात आता विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले असल्याचे महापौरांनी सांगितले़ महापालिकेत एकमेव अपक्ष नगरसेवकाने विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा करणे ही बाबही आता नव्या राजकारणाला आमंत्रण देत आहे़

Nanded Manpa claims to be the only Leader of Opposition Leader! | नांदेड मनपात एकमेव अपक्षाचा विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा !

नांदेड मनपात एकमेव अपक्षाचा विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेत सुरू असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाचे त्रांगडे कायम असताना महापौर शीलाताई भवरे यांनी या पदासाठी अपक्ष नगरसेवक संदीपसिंघ गाडीवाले यांनीही दावा केल्याची माहिती दिली आहे़ त्यामुळे या सर्व प्रकरणात आता विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले असल्याचे महापौरांनी सांगितले़ महापालिकेत एकमेव अपक्ष नगरसेवकाने विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा करणे ही बाबही आता नव्या राजकारणाला आमंत्रण देत आहे़
भाजपाच्या नगरसेविका गुरप्रीतकौर सोडी यांना विरोधी पक्षनेते पद द्यावे याबाबत भाजपा शहराध्यक्षांनी महापौरांना पत्र दिले़ मात्र विरोधी पक्षनेतेपद देण्यास होत असलेल्या विलंबामुळे आपण विरोधी पक्ष नेता कक्षाचा ताबा घेऊ असे पत्र सोडी यांनी १७ फेब्रुवारी रोजी महापौरांना दिले़
या अनुषंगाने विरोधी पक्ष नेतापदास मान्यता नसल्याने नगरसचिव विभागाने मनपातील विरोधी पक्षनेता कक्षास सील ठोकले़ दुसरीकडे सभागृहनेता पदास मान्यता नसताना सभागृह नेता कक्ष कसा उघडा ठेवला गेला याबाबत आक्षेप घेत नगरसेविका गुरप्रीतकौर सोडी यांनी कारवाईची मागणी केली़
त्यामुळे महापालिका प्रशासनाने सभागृह नेता कक्षलाही सील ठोकले़ त्यानंतर दुसºयाच दिवशी गुरूवारी काँग्रेसने महापालिकेच्या सभागृह नेतेपदी विरेंद्रसिंघ गाडीवाले यांची फेरनिवड केली़ या निवडीनंतर सभागृह नेता कक्ष उघडण्यात आला़
सभागृह नेते पदाचा विषय संपुष्टात आला असताना विरोधी पक्ष नेतेपदाचे त्रांगडे मात्र आणखी किचकट झाले आहे़ महापालिकेतील एकमेव अपक्ष नगरसेवक असलेल्या संदीपसिंघ गाडीवाले यांनी आपल्यासोबत काही नगरसेवक असून आपल्याला विरोधी पक्षनेतेपद द्यावे अशी मागणी महापौर शीलाताई भवरे यांच्याकडे केली आहे़ त्यामुळे संदीपसिंघ गाडीवाले यांच्या समवेत कोणते नगरसेवक आहेत, हा संशोधनाचा विषय आहे़ ते भाजपाचे आहेत की काँग्रेसचे याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे़
संदीपसिंघ गाडीवाले यांनी आपल्यासोबत कोणते नगरसेवक आहेत हे स्पष्टपणे सांगितले नसतानाही ही बाब महापौरांनी कशाच्या आधारे मान्य केली, वेगळ्या गटाची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे झाली आहे का, विरोधी पक्ष नेतेपदासाठी एका अपक्ष नगरसेवकाने दावा करणे व महापौरांनी त्याला मान्य करणे या सर्व घडामोडी आता नव्याच राजकारणाकडे जाणाºया आहेत़
विशेष म्हणजे एकमेव अपक्षाने केलेल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या दाव्याबाबत महापौरांनी विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविले आहे़ मार्गदर्शन येताच विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही महापौर भवरे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Nanded Manpa claims to be the only Leader of Opposition Leader!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.