नांदेड लोकसभा निवडणूक निकाल 2019: चिखलीकरांची आघाडी कायम; अशोक चव्हाण पराभवाच्या छायेत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 03:18 PM2019-05-23T15:18:22+5:302019-05-23T15:21:15+5:30

Nanded Lok Sabha Election Results 2019

Nanded Lok Sabha Election 2019 live result & winner: Prataprao Govindrao Chikhalikar VS  Ashok Chavan vs Yashpal Bhinge Votes & Results round 40 | नांदेड लोकसभा निवडणूक निकाल 2019: चिखलीकरांची आघाडी कायम; अशोक चव्हाण पराभवाच्या छायेत ?

नांदेड लोकसभा निवडणूक निकाल 2019: चिखलीकरांची आघाडी कायम; अशोक चव्हाण पराभवाच्या छायेत ?

googlenewsNext

नांदेड : नांदेड - महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या नांदेड जिल्ह्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता असून भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर  यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पराभवाच्या छायेत आहेत. मागील लोकसभेला मोदी लाट असतानाही अशोकराव चव्हाण 80 हजार पेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले होते. आज च्या मतमोजणीच्या सुरुवातीला काही काळ अशोक चव्हाण पुढे होते मात्र त्यानंतर सातत्याने भाजपचे चिखलीकर यांनी मताधिक्य राखले, सध्या 30 हजाराची लीड असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. चिखलीकर हे विजयाचा उंबरठ्यावर पोहचले आहेत

मतदारसंघः नांदेड
*फेरीः 42 वी अपडेट
आघाडीवरील उमेदवाराचे नावः प्रताप पाटील चिखलीकर
पक्षःभाजप
मतंः364483

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः अशोकराव चव्हाण
पक्षःकाँग्रेस
मतंः 328854

पिछाडीवरील उमेदवाराचे  नाव- यशपाल भिंगे
पक्ष- वंचित आघाडी
मत- 122642

नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण . मतदार १७ लाख, १७ हजार, ८२५ एवढे असून यंदाच्या निवडणुकीत ६५.१५  टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या अशोक चव्हाण  यांचा ४ लाख ९३ हजार ७५ मतांसह विजय साकारला होता, तर भाजपा उमेदवार डी. बी. पाटील  यांना ४ लाख ११  हजार ६२०  मतं मिळाली होती.
 

Web Title: Nanded Lok Sabha Election 2019 live result & winner: Prataprao Govindrao Chikhalikar VS  Ashok Chavan vs Yashpal Bhinge Votes & Results round 40

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.