नांदेडमध्ये शेतकºयांची पीक कर्जाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:55 AM2017-11-21T00:55:53+5:302017-11-21T00:58:08+5:30

नांदेड : कर्जाची नियमितपणे परतफेड करणाºया शेतकºयांना कर्जमाफीतून वगळण्यात आले़ त्यामुळे यंदा बहुतांश शेतकºयांनी पीक कर्ज घेण्याकडे पाठ फिरविली असून आहे ते कर्ज कायम ठेवल्याचे खरीप आणि रबी हंगामात घेतलेल्या पीक कर्जाच्या आकडेवारीवरून दिसते़ यंदा खरिपासाठी केवळ ९१ हजार १०९ शेतकºयांनी ४२३़६७ कोटी रूपयांचे पीक कर्ज घेतले आहे़ तर रबीसाठी आजपर्यंत केवळ २ टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे़

in Nanded farmers' moved from crop loans | नांदेडमध्ये शेतकºयांची पीक कर्जाकडे पाठ

नांदेडमध्ये शेतकºयांची पीक कर्जाकडे पाठ

googlenewsNext
ठळक मुद्देखरिपात केवळ २८ टक्के पीक कर्ज वाटप : रबी हंगामासाठी आजपर्यंत ९ कोटींचे वाटप


श्रीनिवास भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कर्जाची नियमितपणे परतफेड करणाºया शेतकºयांना कर्जमाफीतून वगळण्यात आले़ त्यामुळे यंदा बहुतांश शेतकºयांनी पीक कर्ज घेण्याकडे पाठ फिरविली असून आहे ते कर्ज कायम ठेवल्याचे खरीप आणि रबी हंगामात घेतलेल्या पीक कर्जाच्या आकडेवारीवरून दिसते़ यंदा खरिपासाठी केवळ ९१ हजार १०९ शेतकºयांनी ४२३़६७ कोटी रूपयांचे पीक कर्ज घेतले आहे़ तर रबीसाठी आजपर्यंत केवळ २ टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे़
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला़ यामध्ये लावलेल्या नियम व अटींमुळे आजपर्यंत प्रत्यक्षात किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला याची माहिती जिल्हा प्रशासनासह, बँक अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कोणाकडेही आकडेवारी उपलब्ध नाही़ केवळ आॅनलाईन अर्ज केलेल्या आणि ग्रीन लिस्टमध्ये असलेल्या शेतकºयांची संख्या प्रत्येकाकडून सांगितली जात आहे़
दरम्यान, कर्जाची नियमित परतफेड करणाºया लाखो शेतकºयांना कर्जमाफीतून वगळण्यात आले़ या नियमामुळे जिल्ह्यातील ६ हजार ८१० चालू बाकीदार, कर्जाची नियमितपणे परतफेड करणाºया शेतकºयांना सरसकट दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही़ तसेच त्यांना दिले जाणारे प्रोत्साहन अनुदानही आजपर्यंत मिळालेले नाही़ त्यामुळे कर्जमाफीचा गोंधळ आजपर्यंत तरी संपलेला नाही़
कर्जमाफीनंतर बहुतांश शेतकºयांनी पीक कर्जाकडे पाठ फिरविली़ मागील वर्षात खरीप हंगामामध्ये ९२ टक्के कर्जवाटप झाले होते़ यंदा केवळ २८ टक्के वाटप झाले आहे़ खरिपासाठी १५२६़२५ कोटी रूपये उद्दिष्ट असताना ९१ हजार १०९ शेतकºयांना केवळ ३२३़६७ कोटी पीक कर्ज वाटप करण्यात आले़ तर रबीची टक्केवारी केवळ २ असून आजपर्यंत ८०४ शेतकºयांनी ८़९९ कोटी रूपये पीक कर्ज घेतले आहे़ रबीसाठी यंदा ३९९़४ कोटी रूपयांचे उद्दिष्ट आहे़
जिल्ह्यात २६ राष्ट्रीयीकृत, १ महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक अशा एकूण २८ बँकाच्या विविध शाखांमधून पीक कर्ज वाटप केले जात आहे़ आजपर्यंत रबी हंगामासाठी वाटप केलेले पीक कर्ज पुढीलप्रमाणे- (उद्दिष्ट आणि वाटप) बँक आॅफ बरोदा (५ कोटी ३३ लाख- वाटप २८ लाख), देना बँक - ( २३ कोटी ४८ लाख - वाटप ५६ लाख), बँक आॅफ इंडिया (१७ कोटी ६९ लाख - वाटप १० लाख), एचडीएफसी बँक (५ कोटी २९ लाख - वाटप ४ कोटी ६२ लाख), आयसीआयसीआय बँक (३ कोटी ११ लाख - वाटप १ कोटी ६७ लाख), महाराष्ट्र ग्रामीण बँक ( ६८ कोटी २३ लाख - वाटप १ कोटी ७५ लाख) पीककर्ज वाटप केले आहे़
युनायटेड कमर्शियल बँक, युनियन बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, आंध्र बँक, अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, ओरिएन्टल बँक, कॉर्पोरेशन बँक, इंडियन ओहरसेझ बँक, विजया बँक, करूर वैश्य बँक, कर्नाटका बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, डीसीबी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी आजपर्यंत रबीसाठी एक रूपयाचेदेखील पीक कर्ज वाटप केले नाही़ यंदाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा वेळ आहे़ आॅक्टोबरपासून रबीसाठी पीक कर्ज वाटप सुरू आहे़ तर खरिपासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत केवळ २८ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे़

Web Title: in Nanded farmers' moved from crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.