नांदेड जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:12 AM2018-04-16T00:12:31+5:302018-04-16T00:12:31+5:30

शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तर हदगाव शहरात दुपारी ४ वाजेपासून विजांच्या कडकडाटांसह गारपीट झाल्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले.

Nanded district resumed after long period | नांदेड जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

नांदेड जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

Next
ठळक मुद्देवादळीवारे : भोकर, हदगाव, मुदखेड, अर्धापूर, लोह्यात पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तर हदगाव शहरात दुपारी ४ वाजेपासून विजांच्या कडकडाटांसह गारपीट झाल्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले.
हवामान खात्याने महाराष्टसह मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तविली होती. दरम्यान, १५ एप्रिल रोजी नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुपारपासूनच अवकाळी पावसाला सुरूवात झाली. अचानक सुरूवात झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच वादळी वा-यामुळे ग्रामीण भागातील अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली असल्याची माहिती आहे.
तसेच हदगाव शहरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी हरभ-याच्या आकाराच्या गाराही पडल्या़ सोसाट्याच्या वा-यामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्यामुळे नागरिकांची चांगलीच दमछाक झाली.
दरम्यान, मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यात हळदीचे सर्वात जास्त पीक घेतले जाते. सध्या हळद काढणीचे काम सुरू असून शेतक-यांनी हळद उघड्यावरच ठेवली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक शेतकºयांसह आंब्याचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. आज सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान होवू नये, यासाठी शेतकºयांची ताडपत्री झाकण्यासाठी एकच तारांबळ उडाली असल्याचे चित्र बघावयास मिळाले.
तसेच नांदेड शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सुटीच्या दिवशी सायंकाळी फिरायला निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच फजिती झाली. त्याचप्रमाणे वादळी वाºयामुळे शहरातील काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तर सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला.
रविवारी दुपारनंतर भोकर, हदगाव आदी तालुक्यांत अवकाळी पाऊस पडल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हदगाव तालुक्यात तर बोराच्या आकाराच्या गारा पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. येवली (ता. हदगाव) येथे पावसामुळे बीएसएनएलचा मनोरा कोसळल्याची माहिती तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान, हदगाव शहर व तालुक्यात मोठी गारपीटही झाली. गारांचा आकार बोराएवढा होता.
भोकरमध्ये पावसामुळे घरांवरील पत्रे उडाली. रविवारी मुदखेडचा आठवडी बाजार होता मात्र विस्कळीत झाला. जवळपास अर्धा तास पाऊस पडला.लोहा तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ५ पासून बरबडा ता. नायगाव येथील वीज पुरवठा खंडित झाला. बारुळ, कौठा ता. कंधार येथे पावसामुळे वादळी वारे व पावसाने हजेरी लावली. कंधार, बहाद्दरपुरा, नवरंगपुरा, मानसपुरी, घोडज, शेकापूर, बीजेवाडी, संगमवाडी, फुलवळ, गऊळ आदी ठिकाणीही पाऊस पडला.

रविवारी दुपारी हदगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती़ त्यानंतर जोरदार गाराही बरसल्या़ बोराच्या आकारांच्या गारांनी नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती़ बच्चे कंपनीला गारा गोळा करण्याचा मोह आवरता आला नाही़


वीजतारा तुटल्याने अख्खे शहर अंधारात
रविवारी सायंकाळी सुरु झालेला अवकाळी पाऊस आणि वाºयामुळे अख्खे नांदेड शहर अंधारात गेले होते़ सायंकाळी सहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरुळीत झाला नव्हता़
महावितरणने दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी चार तास चैतन्यनगर परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवला होता़ त्यानंतर आलेल्या पावसामुळे दिवसभर चैतन्यनगरात वीजपुरवठा खंडितच होता़
गेल्या काही दिवसांत नांदेड शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे़ वीजपुरवठ्याबाबत महावितरणच्या हेल्पलाईनवर चौकशी केली असता, अनेकवेळा समाधानकारक उत्तर मिळत नाही किंवा उत्तरच दिले जात नाही़ नाईकनगर, राज कॉर्नर, समर्थनगर या भागातील ग्राहकांनी संताप व्यक्त केला़ विशेष म्हणजे, नुकतेच महावितरणने सुरक्षित वीजपुरवठ्यासाठी शहरातील अनेक झाडांवर कुºहाड चालविली होती़

 

Web Title: Nanded district resumed after long period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.