बनावट परिक्षार्थी प्रकरणातील पाच जणांचा जामीन नांदेड जिल्हा न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:44 AM2018-04-20T00:44:37+5:302018-04-20T00:44:37+5:30

बनावट परिक्षार्थी प्रकरणामध्ये शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या पाच जणांचा नांदेडचे सातवे जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी जामीन फेटाळला आहे.

Nanded District Court rejected bail for five accused in the fake examiner case | बनावट परिक्षार्थी प्रकरणातील पाच जणांचा जामीन नांदेड जिल्हा न्यायालयाने फेटाळला

बनावट परिक्षार्थी प्रकरणातील पाच जणांचा जामीन नांदेड जिल्हा न्यायालयाने फेटाळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : बनावट परिक्षार्थी प्रकरणामध्ये शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या पाच जणांचा नांदेडचे सातवे जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी जामीन फेटाळला आहे.
बनावट परिक्षार्थी बनून पात्रता नाही अशा व्यक्तीला ती परीक्षा पास करुन त्या निर्णयावर नोकरीला लागलेल्या पंधरा जणांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले होते. त्यात शासकीय निवासी शाळा उमरी येथील सेवक शिवलाल वामन जाधव (३१), शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथे कार्यरत कनिष्ठ लिपिक विठ्ठल नारायण कोकुलवार (२९), आंबेडकर मुलींचे वसतिगृह गोंदिया येथे गृहपाल असलेला अंकुश प्रल्हाद राठोड (३१), नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य शाखेत लिपिक असलेला अमोल गणपत दासरवार (३१) आणि संसदीय कार्य मंत्रालय मुंबईमध्ये कार्यरत लिपिक साहेबराव भिकू चव्हाण (३१) यांनी अटक झाल्यानंतर नांदेडच्या जिल्हा न्यायालयात जामीन मिळावी यासाठी अर्ज केला होता.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक शंकर केंगार आणि पोलीस उपअधीक्षक आर.एम.स्वामी यांनी न्यायालयात सविस्तरपणे या प्रकरणाचा प्रगती अहवाल सादर केला. सरकारी वकील अ‍ॅड. अधार्पूरकर यांनी प्रकरणातील आरोपींना जामीन देवू नये, अद्याप बऱ्याच बाबी तपासात शिल्लक आहेत आणि हे आरोपी जामिनीवर सुटले तर साक्षीदारांवर दबाब आणू शकतील असा मुद्दा मांडला. युक्तीवाद ऐकून न्या. मांडे यांनी बºयाच आरोपींचे हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविले असून त्याचा अहवाल प्राप्त होणे शिल्लक आहे. गुन्ह्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून आरोपींना जामीन देणे योग्य नाही, अशी नोंद करुन या पाच जणांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील मुंजा गिरी, अमोल श्रीमनवार, अक्षय राठोड, नरेश पवार, मनोज जाधव आणि जगदीश राठोड यांच्यासह काही जणांचे जामीन अर्ज सुनावणीसाठी प्रलंबित असून पुढील सुनावणी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने आतापर्यंत चार दोषारोपपत्र दाखल केले असून पाचवे दोषारोपपत्र लवकरच दाखल होणार आहे.

Web Title: Nanded District Court rejected bail for five accused in the fake examiner case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.