नांदेड स्वच्छतेचा आराखडा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 12:02 AM2018-11-08T00:02:55+5:302018-11-08T00:04:56+5:30

ठेकेदाराकडून कचरा वेगवेगळा घेण्याची कोणतीही व्यवस्था नागरिकांनाच घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Nanded Cleanliness Planned Paper | नांदेड स्वच्छतेचा आराखडा कागदावरच

नांदेड स्वच्छतेचा आराखडा कागदावरच

Next
ठळक मुद्देकचरा विलगीकरणही होईनानागरिकांनाच मनपाने दिला कठोर कारवाईचा इशारा

नांदेड : शहरात दरमहा एक ते सव्वाकोटी खर्च करुन स्वच्छता केली जात आहे. मात्र ही स्वच्छता करताना कचऱ्या विलगीकरण केले जात नाही. ठेकेदाराकडून कचरा वेगवेगळा घेण्याची कोणतीही व्यवस्था नागरिकांनाच घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरात क्षेत्रिय कार्यालय १ ते ६ अंतर्गत घरोघरी घनकचरा संकलन करणे, वाहतूक करणे, रस्ते झाडणे, नाली काढणे, नाल्यातील काढलेला कचरा उचलणे व डंपींग ग्राऊंड येथे नेऊन टाकण्याचे आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदारास देण्यात आले आहे. मात्र आजघडीला घरोघरी कचरा संकलित करण्याचे काम कोणत्याही प्रभागात होत नाही. रस्ते सफाई, नाले सफाईचे कामेही अशी-तशीच होत असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. मागील दोन महिन्यात शहरातील अस्वच्छतेमुळे डेंगू, टाईफाईड आदी साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. यासाठी डास हा घटक मुख्यत: कारणीभूत आहे. शहरातील अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरात कचरा उचलण्यासाठी महापालिकेने रुटमॅप तयार करण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र हा रुटमॅप आजघडीला तरी केवळ कागदावरच दिसत आहे. प्रत्यक्षात कचरा उचलण्यासाठी कोणताही रुटमॅप नियमित आणि वेळेवर होत नाही. त्यातच घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याच्या अटीचे पालनही अद्याप ठेकेदाराकडून झाले नाही. एकूणच दरमहा एक ते सव्वा कोटी रुपये खर्चून होत असलेली स्वच्छता ही प्रत्यक्षात होत आहे की कागदावरच होत आहे याकडे लक्ष देण्यास मनपा अधिकारी मात्र कमी पडत आहेत.
शहरात स्वच्छतेचा जागरही कागदावरच
महापालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर हागणदारी मुक्त करणे आणि घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ शहर, सुंदर शहरचा नारा दिला आहे. प्रत्यक्षात शहर स्वच्छतेच्या दृष्टीने घराघरातून कचरा संकलन करणे आवश्यक आहे. स्वच्छता ठेकेदाराचीही ती मुख्य जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात घराघरातून कचरा नेला जात नाही. नागरिकांनी रस्त्यावर फेकलेला कचरा एकत्र केला जातो. त्यात विलगीकरणाचा कोणताच भाग नसल्याचे स्पष्ट आहे. शहरात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. हे चाळीस पथनाट्य नेमके कुठे झाले? हाही संशोधनाचा विषय आहे.

Web Title: Nanded Cleanliness Planned Paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.