मुदखेड बसस्थानकाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:17 AM2019-03-21T00:17:23+5:302019-03-21T00:21:34+5:30

येथील एसटी बसस्थानक मद्यपी, आंबटशौकीनांसाठी अड्डा बनले असून लाखो रूपये खर्च करून उभारलेल्या या इमारतीचा उपयोग प्रवाशांसाठी होत नसल्याने स्थानिक नागरिकांसाठी ही वास्तू डोकेदुखी ठरली आहे़ या परिसरात पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Mudkhed bus stand disturbance | मुदखेड बसस्थानकाची दुरवस्था

मुदखेड बसस्थानकाची दुरवस्था

googlenewsNext
ठळक मुद्दे१५ वर्षांपासून वास्तू धूळ खातबसस्थानक बनले मद्यपी, आंबटशौकिनांचा अड्डा

मुदखेड : येथील एसटी बसस्थानक मद्यपी, आंबटशौकीनांसाठी अड्डा बनले असून लाखो रूपये खर्च करून उभारलेल्या या इमारतीचा उपयोग प्रवाशांसाठी होत नसल्याने स्थानिक नागरिकांसाठी ही वास्तू डोकेदुखी ठरली आहे़ या परिसरात पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
मुदखेड बसस्थानकाचे बांंधकाम पूर्ण होऊन अनेक वर्षे उलटून गेली, तरीही बसस्थानक आवारात एकही बस येत नाही. मुदखेड तालुका असूनही बसस्थानक प्रमुख नाही. लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही वास्तु अनेक वर्षांपासून बंदावस्थेत आहे. त्यामुळे हा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे.
मुदखेडला तालुक्याचा दर्जा मिळाल्यापासून या भागातील नेत्यांनी शहरविकासासाठी नेहमीच एक पाऊल पुढे टाकले. तालुक्यासाठी उपयुक्त अशी तहसील आणि पंचायत समितीची सुसज्ज इमारत उभारली. यासोबत शासकीय विश्रामगृह, तंत्र निकेतन, ग्रामीण रूग्णालय, विद्यालये, महाविद्यालये, नगरपालिका इमारत यासारख्या भव्यदिव्य इमारती उभारल्या. फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलाला आंतरराष्ट्रीयस्तरावर मार्केट मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत़ परंतु, बसस्थानकाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे लोकप्रतिनिधीला अनेकवेळा विरोधकाच्या टिकेला सामोरे जावे लागले. प्रवाशांच्या सोईसाठी बसस्थानकाची व्यवस्था केली खरी, परंतु ते ठिकाण शहरापासून दूर व एकांतात असल्यामुळे पंधरा वर्षांपासून उभ्या असलेल्या बसस्थानकात प्रवासी फिरकत नाहीत़ उन्हाळ्यात, पावसाळ्यात बाहेरुन ये - जा करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ पाहता शहर प्रशासनाने शहरात तीन-चार प्रवासी निवारे उभारुन काही प्रमाणात का होईना प्रवाशांची गैरसोय दूर केली. त्यामुळे बसस्थानक आजही ओसाडच पडले आहे. त्यात वाढलेली मोठमोठी बाभळीची झाडे ही उघड्यावर शौचालय करणाऱ्यांना आडोसा करण्याचे काम ही लाखोंची वास्तु करत असून दारुड्यासाठी तर हे ठिकाण विरंगुळा बैठक, आंबट -शौकीनांचा अड्डा बनला असल्याचे या परिसरात अस्ताव्यस्त पडलेल्या देशी विदेशी दारूच्या, पाण्याच्या बाटल्या व इतर साहित्यावरुन दिसून येते. नांदेड, उमरीकडे जाणा-या अनेक एसटी बसेस स्थानकाकडे न वळता रस्त्यावरच परस्पर उभ्या राहत असतात. त्यामुळे प्रवाशांना भरउन्हात रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठांना या बाबीकडे लक्ष घालून प्रवासाची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे़
मुदखेड बसस्थानकाचे बांंधकाम पूर्ण होऊन अनेक वर्षे उलटून गेली, तरीही बसस्थानक आवारात एकही बस येत नाही. मुदखेड तालुका असूनही बसस्थानक प्रमुख नाही.
नांदेड, उमरीकडे जाणा-या एसटी बसस्थानकाकडे न वळता रस्त्यावरच उभ्या राहतात़ त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागते़
प्रवासी निवा-यामुळे बसस्थानक ओसाड
उन्हाळ्यात, पावसाळ्यात बाहेरुन ये -जा करणा-या प्रवाशांची तारांबळ पाहता शहर प्रशासनाने शहरात तीन- चार प्रवासी निवारे उभारले़ त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली़ मात्र, त्यामुळे बसस्थानक ओसाड पडले आहे. त्यात वाढलेली बाभळीची झाडे ही उघडयावर शौचालय करणा-यांसाठी आडोसा ठरले आहेत़ लाखों रूपये खर्च करून उभारलेली ही वास्तु मद्यपी व आंबटशौकीनांचा अड्डा बनला असल्याचे या परिसरात अस्ताव्यस्त पडलेल्या दारूच्या, पाण्याच्या बाटल्या व इतर साहित्यावरुन दिसून येते.
बसफे-या वाढल्यानंतर बसस्थानक सुरू करणार
मुदखेड येथे एस.टी.बसच्या फे-या कमी झाल्यामुळे बसस्थानक बंद आहे. म.रा.प.म.विभागाला मुदखेड येथील बसस्थानकासाठी वाहतूक नियंत्रक देण्यास परवडणारे नाही. यामुळे वरिष्ठ पातळीवरून सदरील बसस्थानक बंद करण्याचे आदेश आहेत. म्हणून, बसस्थानकाची इमारत बंद अवस्थेत आहे.मुदखेड परिसरात एस.टी. बसच्या फेºया वाढल्यानंतर आम्ही वरिष्ठांकडे वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करुन बसस्थानक सुरु करण्यासंदर्भात अहवाल विभागीय कार्यालयाकडे पाठवू. सध्या मुदखेड येथे दिवसभरात फक्त १५ ते २० बसफे-या होत आहेत -पुरुषोत्तम व्यवहारे, डी.एम.म.रा.प.विभाग नांदेड

Web Title: Mudkhed bus stand disturbance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.