आई, मुलगा, दोन चुलत्यांना एकाच चितेवर भडाग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:10 AM2019-03-19T01:10:55+5:302019-03-19T01:12:32+5:30

कार व कंटेनर ट्रकच्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जखमी झाल्याची घटना १७ मार्च रोजी सकाळी ६ वाजता घडली.

Mother, son, two cats burst into a single face | आई, मुलगा, दोन चुलत्यांना एकाच चितेवर भडाग्नी

आई, मुलगा, दोन चुलत्यांना एकाच चितेवर भडाग्नी

Next

मुखेड : कार व कंटेनर ट्रकच्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जखमी झाल्याची घटना १७ मार्च रोजी सकाळी ६ वाजता घडली. यातील मयत आई, मुलगा, दोन चुलत्यांना एकाच चितेवर १० वर्षांच्या केदार नागनाथ चमकुरे याने भडाग्नी दिला. उपस्थितांना यावेळी अश्रू आवरता आले नाही.
मुखेड तालुक्यातील सावरगाव पी. येथील रहिवासी एकाच कुटुंबातील आठ जण आपल्या गावची यात्रा संपवून गुजरात राज्यातील उमरगाव (जि. वलसाड) येथे जात असताना ही घटना घडली.
या अपघातात नागनाथ चमकुरे (वय ४० चुलतभाऊ), योगेश खुशालराव चमकुरे (वय २८ भाऊ), अनुजा शंकर चमकुरे (वय २६ पत्नी), अनिकेत शंकर चमकुरे (वय १० मुलगा) यांचा जागेवरच मृत्यू झाला. शंकर खुशालराव चमकुरे (वय ३५), खुशाल माधवराव चमकुरे (वय ६० वडील) सुशीलाबाई खुशालराव चमकुरे (वय ५५ आई), आरोही शंकर चमकुरे (वय ८ मुलगी) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेत मयतांचे जामखेड येथील शासकीय रुग्णालयात विच्छेदन करुन १८ मार्च रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावात आणण्यात आले. चारही शव घरी येताच अख्खा गाव पाहण्यासाठी उभा होता.

Web Title: Mother, son, two cats burst into a single face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.